AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana Box Office Collection Day 20: आदिनाथ कोठारेच्या सिनेमाचा नवा विक्रम, थेट पुष्पा 2 आणि धुरंधरला टाकले मागे

Ramayana Box Office Collection Day 20: रणबीर कपूर स्टारर 'रामायण'ने रिलीजच्या २०व्या दिवशी कमाल केली आणि या चित्रपटाने शानदार कमाई केली. त्याचबरोबर या चित्रपटाने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

Ramayana Box Office Collection Day 20: आदिनाथ कोठारेच्या सिनेमाचा नवा विक्रम, थेट पुष्पा 2 आणि धुरंधरला टाकले मागे
RamayanImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 25, 2026 | 7:40 AM
Share

सध्या जगभरात रामायण या सिनेमाची चर्चा रंगली आहे. या सिनेमात रणबीर कपूर, यश, आदिनाथ कोठारे आणि साई पल्लवी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाने तिसऱ्या वीकेंडला शानदार कमाई केली आहे. मात्र तिसऱ्या सोमवारी त्याच्या कमाईची गती मंदावली. त्यानंतर निर्मात्यांनी नवीन डाव खेळला आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी तिकिटांच्या किमती कमी केल्या. यामुळे तिसऱ्या मंगळवारी ‘रामायण’च्या कमाईत पुन्हा तेजी दिसून आली. चला, नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाने रिलीजच्या २०व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया.

‘रामायण’ने २०व्या दिवशी किती कलेक्शन केले?

‘रामायण’ने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत अनेक टप्पे पार केले आहेत आणि आता हा चित्रपट १ हजार कोटी रुपयांच्या कमाईकडे वेगाने वाटचाल करत आहे. मात्र तिसऱ्या मंगळवारी म्हणजे रिलीजच्या १९व्या दिवशी त्याने आतापर्यंतचे सर्वात कमी कलेक्शन केले. तो फक्त १२.७० कोटीच कमावू शकला. पण निर्मात्यांनी आता ‘रामायण’च्या तिकिटांच्या किमती ८० टक्क्यांपर्यंत कमी केल्या आहेत आणि हा चित्रपट ९९ रुपयांमध्ये पाहता येतो. तिसऱ्या मंगळवारी म्हणजे रिलीजच्या २०व्या दिवशी ‘रामायण’ला निर्मात्यांच्या या रणनीतीचा फायदा झाला आणि त्याच्या कमाईत पुन्हा वाढ झाली.

वाचा: 47 वर्षांचा हिरो 20 वर्षांची अभिनेत्री, 43 वर्षांपूर्वीचा सुपरहिट सिनेमा पुन्हा चर्चेत

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार ‘रामायण’ने रिलीजच्या २०व्या दिवशी म्हणजे तिसऱ्या मंगळवारी १७.५० कोटींची कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटाची भारतातील २० दिवसांची नेट कमाई आता ९७२.७५ कोटी रुपये झाली आहे. यात हिंदीत चित्रपटाने २०व्या दिवशी १४.२५ कोटी कमावले. तर मल्याळममध्ये त्याचे कलेक्शन १.२५ कोटी रुपये राहिले आणि कन्नडमध्ये त्याने ९० लाखांची कमाई केली. तर तामिळमध्ये ७० लाख आणि तेलुगूमध्ये ४० लाख रुपयांची कमाई केली. यासोबतच ‘रामायण’ची भारतातील २० दिवसांची नेट कमाई आता ९७२.९५ कोटी रुपये झाली आहे.

तिसऱ्या मंगळवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला

‘रामायण’ने रिलीजच्या २०व्या दिवशी कमाल केली. या चित्रपटाने तिसऱ्या मंगळवारी कमाईत तेजी दाखवलीच, शिवाय १७.५० कोटींची कमाई करून तो तिसऱ्या मंगळवारी सर्वाधिक कलेक्शन करणारा पहिला चित्रपट बनला. यासोबतच त्याने ‘धुरंधर’चे १७.२५ कोटी, ‘पुष्पा २’चे ११.५० कोटी, ‘केजीएफ २’चे ९.५७ कोटी, ‘धुरंधर २’चे ९.५० कोटी आणि ‘बाहुबली २’चे ६.९५ कोटींचे तिसऱ्या मंगळवारचे कलेक्शन मागे टाकले आहे.

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी