
रसेल वायपर - घोणस (Russell Viper Snake)- रसेल वायपर सापाला मराठीत घोणस म्हणतात याची पिल्ले नेहमीच शेतात, झाडाझुडुपात आणि ओलसर जागेत असतात. याचा रंग हलका तपकीरी असून पाठीवर गोल गोल डिझाईन असते. दिसायला हा साप जरी लहान असला तर याचे विष मरण देण्यास पुरसे असते. भारतात सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूत या सांपाचा नंबर वरचा आहे. या साप चावला तर शरीरात तीव्र वेदना, सूज आणि रक्त वाहते, रक्तात विष भिनल्यानंतर मृत्यू येतो.

इंडियन कोब्रा (Indian Cobra Snake) - कोब्राला नाग म्हणतात.त्याची पिल्ले जरी चावली तर त्यांच्या दंशाने मृत्यू निश्चित होतो. कोब्राच्या दंशाने मेंदू आणि मज्जासंस्था प्रभावित होते. ज्याने श्वास घेण्यास त्रास होतो. चक्कर येणे, घाबरल्यासारखे होणे किंवा माणूस बेशुद्ध होतो. काही तासांत शरीरात विष भिनल्याने माणूस मरू शकतो.

बँडेड करॅत (Banded Krait Snake)- बँडेड करॅत सापांची पिल्ले सुंदर काळी आणि पिवळी रंगाची असतात. त्यामुळे लोकांना ती आकर्षित वाटतात. या सांपाच्या विषातील न्यूरोटॉक्सिन्स स्नायूंना अपंगत्व आणते, श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. एण्टी व्हेनम लस न दिल्यास व्यक्तीचा काही तासांत मृत्यू होतो.

कॉमन करॅत - मण्यार (Common Krait Snake) - या सापाला मण्यार देखील म्हणतात, या सांपाच्या पाठीवर पट्टे असतात, हा सांप रात्रीचा सक्रीय असतो,त्यामुळे लोक झोपेत असताना हा साप चावतो. विशेष म्हणजे हा सांप चावल्यानंतर लगेच दुखत नाही.त्यामुळे लोकांना कळत नाही की त्यांना सापाने दंश केला आहे. याचे विष मज्जासंस्थेवर परिणाम करते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. वेळीच उपचार न मिळाल्याने प्राण जातात.

सॉ-स्केल्ड वायपर- फुरसे (Saw Scaled Viper Snake)- हा सापांच्या शरीरावर छोटे जाळीदार डिझाईन त्वचा खरखरीत असते. याची पिल्ले सुंदर दिसतात. या सापाला हिस्सींग वायपर देखील म्हटले जाते. कारण हा सांप धोका जाणवल्यास त्याची त्वचा घासून घाबरवणारा आवाज काढतो. याचे विष रक्त बनविण्याची प्रक्रिया बाधित करते. त्यामुळे अंतस्राव सुरु होतो. वेळीच उपचार न झाल्यास काही तासांत मृत्यू होतो.