
ओट्स: ओट्समध्ये विरघळणारा फायबर असतो, जो बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करत असतो. हा आर्टरिजला ब्लॉक होण्यापासून वाचवतो आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखतो.

अक्रोड: अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड्स आणि एंटीऑक्सीडेंट्स असतात. जे सूज कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हार्ट डिसिजचा धोका कमी होतो.

मासे : फॅटी फिश उदा. सालमन वा सार्डिन मासे हार्टच्या आरोग्यासाठी चांगले असतात. हे मासे ट्रायग्लिसराईड्सला नियंत्रित करतात आणि ब्लड प्रेशरला बॅलन्स करतात.

हिरव्या भाज्या : पालक, मेथी, राईच्या पानांच्या भाज्यात नायट्रेट्स असते. त्यामुळे ब्लड प्रेशर घटते आणि आर्टरिज लवचिकपणा देतात.

ऑलिव्ह ऑईल: ऑलिव्ह ऑईलमध्ये हेल्दी मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात.जे कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करते. आणि हृदयाच्या आजारात सुरक्षा देते.

डार्क चॉकलेट: ७० % किंवा जास्त कोको असणारे डार्क चॉकलेट्समध्ये फ्लेवोनॉयड्स असते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते. आणि त्यामुळे हृदयाला स्ट्रेसपासून वाचवते.