ॲसिडिटीचा त्रास दूर करण्यासाठी अवलंबवा ‘हे’ घरगुती उपाय

ॲसिडिटीचा त्रास केवळ मोठ्या व्यक्तींनाच नव्हे तर तरूणाईलाही होतो. हा त्रास दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय लाभदायक ठरतात.

| Updated on: Jan 24, 2023 | 11:49 AM
1 / 5
आजकाल केवळ मोठ्या अथवा वृद्ध व्यक्तीनांच नव्हे तर तरूण वर्ग किंवा लहान मुलांनाही पोटातील ॲसिडिटीचा त्रास होतो.  जे लोक संपूर्ण दिवस बसून काम करतात, त्याच्यांसाठी ॲसिडिटी ही मोठी समस्या ठरते व त्याचा वारंवार त्रास होताना दिसतो.

2 / 5
झोप पूर्ण न होणे, मसालेदार व तेलकट पदार्थांचे सेवन करणे, व्यायाम अथवा शारीरिक हालचाली न करणे हे ॲसिडिटीसाठी कारणीभूत ठरू शकते. आंबट ढेकर येणे, पोट फुगणे, छातीत जळजळ होणे, उलटी होणे ही ॲसिडिटीची लक्षणे आहेत. हा त्रास दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय लाभदायक ठरतात.

3 / 5
अन्न चावून खावे - पटापट जेवल्याने अन्न पचायला वेळ लागतो आणि पोट फुगलेले दिसते. त्यामुळे अन्नपदार्थ खाताना नेहमी शांतपणे आणि चावून चावून खावे. यामुळे  ॲसिडिटीचा त्रासही होत नाही.

4 / 5
चिया सीड्स -  ॲसिडिटी दूर करण्यासाठी चिया सीड्स खूप गुणकारी ठरतात. त्यांचे सेवन केल्याने वजन कमी करण्यासही मदत होते. तसेच अन्न चांगले पचते. यासाठी ग्लासभर पाण्यात एक चमचा चिया सीड्स रात्रभर भिजवाव्यात आणि ते पाणी सकाळी उठल्यावर प्यावे.

5 / 5
गूळ आणि बडीशेप - बडीशेप ही अन्न पचवण्यास मदत करते आणि पोट निरोगी ठेवते. बडीशेप आणि गूळ एकत्र खाल्याने  ॲसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो. यासाठी एका वाटीत बडीशेप घेऊन ती 2 तास उन्हात ठेवावी. नंतर ती मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी. ही पावडर गुळाच्या पावडरमध्ये मिक्स करावी. जेवणानंतर अर्ध्या तासाने  1 चमचा बडीशेप व गुळाचे मिश्रण खावे.