खंडाळा, लोणावळा सोडा, डोंबिवलीजवळ आहेत सुंदर धबधबे, सौंदर्य पाहूनच थक्क व्हाल

तुम्ही देखील रविवारी दररोजच्या धावपळीतून शांत निसर्ग, धबधब्याचा आनंद लुटण्याचा विचार करत असाल तर लांब जाण्याची गरज नाही. डोंबिवलीजवळ आहेत सुंदर धबधबे. एकदा गेलात तर पुन्हा-पुन्हा जाल.

| Updated on: Jul 24, 2026 | 6:34 PM
1 / 5
पावसाळा सुरू होताच निसर्गप्रेमींना हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, धबधबे अशा ठिकाणांची ओढ लागते. शहराच्या धकाधकीपासून काही काळ दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी अनेक जण जवळच्या पर्यटनस्थळांचा शोध घेतात.

पावसाळा सुरू होताच निसर्गप्रेमींना हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, धबधबे अशा ठिकाणांची ओढ लागते. शहराच्या धकाधकीपासून काही काळ दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी अनेक जण जवळच्या पर्यटनस्थळांचा शोध घेतात.

2 / 5

जर यंदा माथेरानला जाणे शक्य नसेल, तर डोंबिवलीजवळील सुंदर धबधबे हा उत्तम पर्याय ठरू शकतात. डोंबिवलीपासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर असलेले हे धबधबे पावसाळ्यात मनमोहक रूप धारण करतात.

3 / 5

हिरवाईने वेढलेला परिसर, धुक्याची चादर आणि कोसळणारे पाणी पर्यटकांना वेगळाच अनुभव देतात. यामध्ये पांडवकडा धबधबा हा पर्यटकांच्या विशेष पसंतीचा आहे.

4 / 5

पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. त्यामुळे अनेक पर्यटक येथे भेट देत असतात. तसेच देवकुंड धबधबा देखील निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. पावसाळ्यात येथे मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करतात.

5 / 5

मात्र, या ठिकाणी भेट देताना सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पाण्याचा प्रवाह वाढलेला असल्यास धबधब्याजवळ जाणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि निसर्गाचा आनंद जबाबदारीने घ्यावा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us