Actor Life : त्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मुली तर…, पॉर्नस्टार झालेल्या अभिनेत्याला पश्चाताप
झगमगत्या विश्वात पदार्पण केल्यानंतर सर्वकाही चांगलं होईल असं नसतं. अनेक कलाकारांना मोठ्या संकटांचा देखील समाना करावा लागतो. आता देखील असंच घडल्याची माहिती समोर येत आहे. खुद्द अभिनेत्याने याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

बॉलिवूड आणि टीव्ही विश्वात येणाऱ्या प्रत्येक कलाकाराचं भग्य चमकतं असं काहीही नाही. कलाकारांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अनेकांना इंडस्ट्रीमध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी बी ग्रेड सिनेमात देखील काम करावं लागतं...

शेक्सपियर त्रिपाठी देखील अशाच अभिनेत्यांपैकी एक आहे. ज्याने नाईलाजाने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आणि काम सुरुर केलं. पण आज अभिनेता आलिशान आयुष्य जगत आहे.

शेक्सपिअर म्हणतो, लोक हात जोडून त्यांच्याकडे यायचे आणि त्यांच्या सहवासात किंवा त्याच्यासोबत काम करण्याची विनंती करतात. अभिनेता म्हणतो, "मला तुमच्यासोबत काम करायचं आहे; कृपया मला काम करण्याची संधी द्या."

अभिनेता म्हणतो मुली मला त्यांचे प्रायव्हेट फोटो पाठवयाचे. मुलं देखील मला म्हणायचे, चल आपण अय्याशी करु... आम्हालाही संधी दे... अभिनेता पुढे म्हणाला, 'लोकांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते...', तो असं देखील म्हणाला, पॉर्न इंडस्ट्रीचा भाग असणं फार वाईट गोष्ट आहे...

अभिनेत्याचं म्हणणे आहे की, जर त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर ते जीवे मारण्याच्या धमक्या देतात. जरी अनेक लोक या व्यवसायात येत असले, तरी ते अनेकदा मध्येच हा व्यवसाय सोडून देतात.