
अभिनेता बरुण सोबती याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. इतकेच नाही तर अभिनेता ओटीटीवर देखील धमाका करताना दिसतोय.

बरुण सोबती याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. नुकताच बरुण सोबती याने मोठे विधान केले आहे. टीव्ही अभिनेत्यांसोबत होणाऱ्या भेदभावावर बोलताना बरुण सोबती हा दिसला आहे.

बरुण सोबती याच्या असुर वेब सीरिजचे दोन्ही भाग हिट ठरले आहेत. बरुण सोबती म्हणाला की, हे अनेक टीव्ही कलाकारांसोबत घडते. टीव्ही अभिनेत्यांना चित्रपट किंवा वेब सीरिजमध्ये ऑडिशनसाठीही काम करावे लागते.

निर्माते अनेकदा म्हणतात की, हा मुलगा टीव्हीचा आहे...पुढे बरुण सोबती म्हणाला की, मुळात म्हणजे मला चांगली भूमिकाच फार कमी वेळा मिळाली आहे. मी बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये आहे.

परंतू मला वाटते की, मी खूप कमी काम केले आहे. मला नेहमीच चांगल्या भूमिका मिळण्यासाठी वाट पाहवी लागली आहे. त्यामध्येच मला असुर मिळाली.