एकाच चित्रपटात 165 भूमिका साकारणारा अभिनेता, 21 वर्षांपूर्वी घेतली 40 कोटी फी, नाव ऐकून..

उंची 52 इंच, 21 वर्षांपूर्वी या चित्रपटात या अभिनेत्याने साकारल्या होत्या 165 भूमिका. चित्रपटासाठी घेतली होती 40 कोटी इतकी फी. कोण आहे हा अभिनेता?

| Updated on: Aug 04, 2026 | 4:21 PM
1 / 5
चित्रपटांमध्ये दुहेरी किंवा तिहेरी भूमिका साकारणारे कलाकार आपण अनेकदा पाहिले आहेत. मात्र, एका चित्रपटात तब्बल 165 भूमिका साकारणारा अभिनेता तुम्ही कधी पाहिला आहे का? ही अनोखी कामगिरी अभिनेता दीप रॉय यांनी केली असून, त्यांच्या या विक्रमाची आजही चर्चा होते.

चित्रपटांमध्ये दुहेरी किंवा तिहेरी भूमिका साकारणारे कलाकार आपण अनेकदा पाहिले आहेत. मात्र, एका चित्रपटात तब्बल 165 भूमिका साकारणारा अभिनेता तुम्ही कधी पाहिला आहे का? ही अनोखी कामगिरी अभिनेता दीप रॉय यांनी केली असून, त्यांच्या या विक्रमाची आजही चर्चा होते.

2 / 5

2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी' या चित्रपटात दीप रॉय यांनी एक-दोन नाही तर तब्बल 165 भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाच्या दिग्दर्शकांना दीप रॉयसारखे दिसणारे अनेक कलाकार मिळत नसल्याने कास्टिंगमध्ये अडचणी येत होत्या.

3 / 5

त्यावेळी दीप रॉय यांनी स्वतः पुढाकार घेत सर्व भूमिका साकारण्याची तयारी दर्शवली. शूटिंगदरम्यान त्यांनी प्रत्येक ऊम्पा-लूम्पा पात्रासाठी वेगवेगळे हावभाव, चेहऱ्यावरील भाव आणि प्रतिक्रिया स्वतंत्रपणे साकारल्या.

4 / 5

त्यानंतर एडिटिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्सच्या मदतीने ही सर्व पात्रे एकाच वेळी पडद्यावर दाखवण्यात आली. त्यांच्या या अभिनय कौशल्याने आणि मेहनतीने प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टीही प्रभावित झाली.

5 / 5

माहितीनुसार, या चित्रपटातील दमदार कामगिरीनंतर दीप रॉय यांच्या मानधनातही मोठी वाढ झाली. एका चित्रपटात 165 भूमिका साकारण्याचा त्यांचा हा पराक्रम आजही हॉलीवूडमधील सर्वात वेगळ्या अभिनय कामगिरींपैकी एक मानला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us