
यामी गौतम हिची आज बॉलिवूडच्या नामवंत अभिनेत्रींमध्ये गणना होते. विकी डोनरपासून ते आर्किटल 370 पर्यंतचा तिचा प्रवास अत्यंत रंजक आहे. अवघ्या काही वर्षांच्या कारकिर्दीत तिने एकाहून एक सरस भूमिका केल्या. यामी अतिशय आलिशान आयुष्य जगते, तिचं नेटवर्थ ऐकून तुम्हीदेखील हैराण व्हाल. (Photo : Instagram)

2012 साली आलेल्या 'विकी डोनर' चित्रपटातून यामीने अभिनय कारकिर्दीला सुरूवात केली. या चित्रपटाद्वारे तिने अभिनेता आयुष्मान खुरानासह बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हाँ चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगला चालला आणि त्या दोघांच्याही भूमिकेचे बरेच कौतुक झालं.

यामुळेच यामीचे नशीब उजळले आणि त्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आज ती कोट्यवधींची मालकीण आहे.

यामी गौतमने प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले आहे. पण तिचं नेटवर्थ पतीपेक्षाही जास्त आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामी गौतम आज जवळपास 99 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे. एका चित्रपटासाठी ती 5 ते 8 कोटी रुपये फी घेते.

यामीची बहुतांश कमाई ही चित्रपटांद्वारे होते. मात्र त्याशिवाय ती ब्रँड शूट्स आणि सोशल मीडियाद्वारेही पैसे कमावते.

‘आर्टिकल 370’ या चित्रपटात यामी शेवटची दिसली होती.