
विधीवत पूजा : सकाळच्या प्रहरी ऊसतोड कामगारांनी झोपडीसमोरच सर्वकाही स्वच्छ करुन हा परिसर शेणाने सारवून घेतला होता. एवढेच नाही तर आकर्षक रांगोळी काढून विधीवत पूजा करुन गुढी उभारली होती.

परस्थितीची तमा न बाळगता कामगार तल्लीन: सण - उत्सवात झगमगाट असावाच असे काही नाही. अगदी साध्या पध्दतीनेही सण कसा साजरा केला जातो याचे उदाहरण नांदेड जिल्ह्यात पाहवयास मिळाले आहे. प्रत्येक पालावरील ऊसतोड मजुरांनी अशाच प्रकारे गुढीपाडवा साजरा केला आहे.

पालांवर गुढ्यांचे दर्शन: यंदा ऊसतोड हंगाम लांबल्याने ऊसतोड कामगारांना हा गुढी पाडवा सण ऊसाच्या फडाजवळच साजरा करावा लागत आहे. असे असतानाही कामगारांनी आपल्या उत्साहामध्ये तीळभर पण कमी दाखवलेली नाही.

ऊसतोड कामगारांमध्ये उत्साह : मराठी नववर्षाचे स्वागत पालावर असताना झाले असले तरी कामगारांचा उत्साह मात्र, कायम होता. एरव्ही कोयत्याने मजबूत वार करत ऊसतोड करणाऱ्या राकट हाथांनी आज मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केल्याचे चित्र दिसलंय. परिस्थिती कशीही असो सण साजरे करताना मराठी माणूस कायम उत्साही असतो, हे यावरून दिसून येतंय.