ज्या हॉटेलमध्ये वडील वेटर होते, तेच हॉटेल या अभिनेत्याने विकत घेतलं, वडिलांना दिलं खास गिफ्ट

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता, ज्याच्या वडीलांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून केलं काम. अभिनेत्याने तेच हॉटेल घेतलं विकत. आजही कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे हा अभिनेता.

| Updated on: Apr 10, 2026 | 1:00 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये अनेक असे सुपरस्टार आहेत, ज्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मोठं नाव कमावलं आणि जगभरात प्रसिद्धी मिळवली. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अण्णा म्हणून ओळखले जाणारे सुनील शेट्टी. या अभिनेत्याच्या यशामागे केवळ त्याची मेहनत नाही तर त्याच्या वडिलांचा संघर्षही तितकाच मोठा आहे.

2 / 5

सुनील शेट्टीने एका मुलाखतीत सांगितले होते की त्याच्या वडिलांनी खूप कठीण परिस्थितीत जीवन जगले. त्याचे वडील वीरप्पा शेट्टी हे एकेकाळी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होते. अत्यंत साध्या परिस्थितीतून त्यांनी आपला प्रवास सुरू केला होता.

3 / 5

दीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर त्यांनी 1943 साली एक संपूर्ण इमारत विकत घेतली. ही इमारत मुंबईतील वर्ली परिसरात, Four Seasons Hotel Mumbai जवळ आहे. हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. वेटरपासून ते मालक होण्यापर्यंतचा!

4 / 5

2013 साली आपल्या डेकोरेशन शोरूमच्या उद्घाटनावेळी सुनील शेट्टीने सांगितले की त्याने तेच हॉटेल खरेदी केले, जिथे त्यांच्या वडिलांनी कधीकाळी वेटर म्हणून काम केले होते. हा त्याच्या वडिलांसाठी एक खास आणि भावनिक गिफ्ट होते.

5 / 5

अभिनेता म्हणाला की, 'माझे वडील माझे खरे हिरो आहेत. त्यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला पण कधीही कोणत्याही कामाची लाज बाळगली नाही. त्यांनी मला देखील हेच शिकवले.' मीडिया रिपोर्टनुसार सुनील शेट्टीची एकूण संपत्ती 125 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us