
heart disease

तुम्ही हे पदार्थ रोज खात असाल तर वेळीच सतर्क होणे गरजेचे आहे. यात पहिल्या क्रमांकावर येते ते म्हणजे पांढरी साखर. साखरेला पांढऱ्या रंगाचे विष म्हटले जाते. साखर जास्त प्रमाणात खाल्ली तर टाईप-2 मधूमेह होण्याची शक्यता वाढते तसेच हृदयविकाराचा झटका येण्यासही साखर कारणीभूत ठरू शकते.

अधिक प्रमाणात मीठ खाणे हे आरोग्यासाठी हानीकारक असते. कारण आहारात जास्त मीठ असेल तर उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाबाचा हृदयावरही अनिष्ट परिणाम होऊ शकतो त्यामुळे हॉर्ट अटॅक, स्ट्रोक यापासून दूर राहायचे असेल तर जेवणात मीठाचा योग्य प्रमाणाताच समावेश असावा.

मैदा वापरण्याचे प्रमाण आजकाल फारच वाढले आहे. पण मैद्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे, मिनरल्स जवळपास नसतात. त्यामुळे मैद्यापासून तयार झालेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्लायस रक्तातील साखर वाढते. त्यामुळे वजन वाढते आणि बेली फॅट्सही वाढते. मैदा हा हृदयासंदर्भातील आजार होण्याचे कारण ठरू शकते. त्यामुळे मैदा खाणे टाळावे.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)