
कोण कोणाशी डेटिंग करत होतं, कोणाचं नातं अपूर्ण राहिलं... बॉलिवूडच्या अशा बातम्या लोक मोठ्या उत्सुकतेने वाचतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत ज्यांचे प्रेम जीवन चर्चेत राहिलंय. आजही त्यांच्या कथा सोशल मीडियावर खूप वाचल्या जातात. त्यात अमिताभ बच्चन, रेखा आणि जया यांच्या लव्ह ट्रँगलबजद्दलही बरीच चर्चा झाली आहे. पण एक अशी अभिनेत्रीदेखील होती, जी बिग बींसाठी रात्र-रात्र रडायची. तिचं नाव माहीत आहे का ?

मध्यरात्री उठून अमिताभ बच्चनसाठी रडायची ती अभिनेत्री म्हणजे रेखा नव्हे, जया बच्चनही नाहीच. या अभिनेत्रीची अवस्था पाहून महेश भट्ट यांनी अमिताभ बच्चन यांना भेटण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपला अहंकार बाजूला ठेवला आणि अभिनेत्याशी संपर्क साधला होता.

खरंतर ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नव्हे तर परवीन बाबी आहे. आणि ही 1980 च्या 'दोस्ताना' चित्रपटावेळची कथा आहे. आयएमडीबीच्या अहवालानुसार, या चित्राच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्री बंगळुरूमध्ये उपचार घेत होती. तिला 'स्किझोफ्रेनिया' नावाचा मानसिक आजार होता.

जेव्हा परवीन बाबी या चित्रपटाचे चित्रीकरण करत होती, तेव्हा तिला अनेक वैद्यकीय समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यावेळी, ती मध्यरात्री उठायची आणि अमिताभ बच्चनसाठी मोठ्याने रडू लागायची.

अशा परिस्थितीत महेश भट्ट यांनी अमिताभ बच्चन यांना भेटण्याचा निर्णय घेतला आणि चित्रपटाच्या सेटवर पोहोचले. परवीन बाबीशी चांगलं वागा , तिची काळजी घ्या अशी विनंती महेश भट्ट यांनी बिग बींना केली होती. ती खूप त्रासातून जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

तेव्हा अमिताभ बच्चन यांनी काळजी घेण्याचे आश्वासन दिले. पण रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले की, बिग बी यांनीच महेश भट्ट यांना परवीनची काळजी घेण्यास सांगितले होते. त्यांचे हे शब्द ऐकून महेश भट्ट खूप संतापले. ते फक्त स्वतःबद्दल विचार करतात असं त्यांना वाटलं होतं. तेव्हा परवीन बाबी हिचं नाव महेश भट्टशी जोडलं जायचं.

अभिनेत्री परवीन बाबीचे डॅनी डेन्झोंग्पा आणि कबीर बेदी यांच्याशी संबंध होते.. यानंतर, विवाहित महेश भट्ट यांच्याशी प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या आल्या. पण 1980 मध्ये त्यांचे नाते तुटले. ती आयुष्यभर प्रेमाचा शोध घेत राहिली, पण तिला खरे प्रेम मिळाले नाही. 20 जानेवारी 2005 रोजी तिने जगाचा निरोप घेतला.