
एक फोटो हा हजार शब्दांपेक्षा बोलका असतो. फोटोंमध्ये अनेक आठवणी असतात, त्यामुळे बरेच लोकं जुने फोटो वगैरे जपून ठेवतात. मात्र, आजच्या डिजिटल युगात, लोक फोटो रील्सपासून दूर गेले आहेत आणि फोटो अल्बमची जागा स्मार्टफोनने घेतली आहे. पण जुन्या अल्बमकडे मागे वळून पाहिल्याने ती मजा, सुखद आठवणी पुन्हा जाग्या होऊ शकतात. फोटो जसजसे जुने होतात तसतसे ते फिकट पडतात किंवा फाटतात.

हवा आणि आर्द्रतेच्या संपर्कात आल्याने ते फिकट होऊ शकतात, ज्यामुळे ते आधीसारखे छान, स्पष्ट दिसणं जवळजवळ अशक्य होतं. पण नवीन टेक्नोलॉजीमुळे तुमचे काही जुने, फोटो नवीन असल्यासारखे नक्कीच पुन्हा तयार करता येतात. तुम्ही AI च्या मदतीने जुने, फाटलेले फोटो अगदी नवीन फोटोंमध्ये रूपांतरित करू शकता. कसं ? चला जाणून घेऊया टिप्स..

त्यासाठी फार काही करावं लागणार नाही, तुम्हाला फक्त तुमच्या जुन्या फोटोचा फोटो काढायचा आहे. नंतर तो गुगल जेमिनी किंवा चॅटजीपीटी वर अपलोड करायचा आणि काही प्रॉम्प्ट वापरून जुना फोटो नवीन फोटोमध्ये रूपांतरित ढं झालं की जुना पण नव्यासारखा झालेल्या त्या फोटोची प्रिंट काढून तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे फोटो दुरुस्त करण्यासाठी काही प्रॉम्प्ट आहेत. तुम्हाला फक्त गुगल जेमिनी किंवा चॅटजीपीटी वर फोटो अपलोड करायचा आहे आणि खाली नमूद केलेले प्रॉम्प्ट्स पेस्ट करायचे आहेत. अशाच काही प्रॉम्प्ट्सबद्दल आपण जाणून घेऊया.

जर फोटोमध्ये एखादा पुरूष असेल तर : “Enhance the clarity and sharpness of this old portrait photo. Repair the cuts and torn out sections. Restore facial details naturally without over-smoothing. Maintain original colors and lighting.” एक फोटो अपलोड करून त्यासोबत हा प्रॉम्प्ट लिहा.

फोटो अस्पष्ट असल्यास : “Make this blurry face photo clearer, improving eyes, skin texture, and hair details while keeping it realistic. Repair any cuts and torn” तुमच्या फोटोसोबत हा प्रॉम्प्ट लिहा.

कौटुंबिक फोटो किंवा लग्नाचा फोटो असेल तर: “Fix the torn areas of this family photo, make the faces clear and sharp, and restore the colors naturally.” हा प्रॉम्प्ट वापरा.

ब्लॅक अँड व्हाईट फोटो कलर करायचा असल्यास : Colorize this old black-and-white photo, remove the cracks, and enhance the facial details for better recognition असा प्रॉम्प्ट त्या फोटोसोबत जोडा. या प्रॉम्प्ट्सनी तुमचं काम सोपं होईल आणि जुने फोटो नव्यासारखे दिसतील.