Todays Gold Rate: आता खरेदीच करु नका! आज पुन्हा सोन्याचे भाव वाढले, 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सतत सोने आणि चांदीचे भाव वाढताना दिसत आहेत. आजचा सोन्याचा भाव पाहून सर्वसामान्यांना तर घामच फुटेल.

| Updated on: May 19, 2026 | 3:46 PM
1 / 5
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने आणि चांदीची खरेदी करु नका असे आवाहन नागरिकांना केले. त्यानंतर सोन्याचा भाव हा सतत वाढत असल्याचे चित्र आहे. वाढलेले भाव पाहून सर्वसामान्यांना सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

2 / 5

जळगावचे सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात आज चांगलीच वाढ झाली आहे. सोन्या आणि चांदीच्या दरात प्रत्येकी 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. हे नवे दर पाहून सर्वसमान्यांना घाम फुटणार आहे.

3 / 5

आज 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटी सह 1 लाख 62 हजार 225 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीचे भाव जीएसटीसह 2 लाख 80 हजार 160 रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 5

आयात शुल्क मध्ये वाढ झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून सोन्याने चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us