Todays Gold Rate: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण, आज 10 ग्रॅमसाठी…
Todays Gold Rate: गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत घसरण होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्की करा...

सोने आणि चांदी खरेदी करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. कारण सतत वाढत असलेले सोने आणि चांदीचे दर पाहाता अनेकांचा यात गुंतवणूक करण्याकडे कल असतो. अशातच गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळे ही आनंदाची बातमी आहे. चला जाणून घेऊया आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय? आहे...
आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे.
6 ऑक्टोबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचे भाव 500 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 51 हजार 925 रुपयांवर पोहोचले आहेत.
तर दुसरीकडे 1 किलो चांदीच्या दरात 2 हजारांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 31 हजार 750 रुपयांवर पोहोचले आहेत.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)