
खऱ्या घटनांवर आधारित क्राइम चित्रपट नेहमीच प्रेक्षकांना हैराण करतात. बॉलिवूडनेही असे अनेक चित्रपट दिले आहेत, जे फक्त रोमांचकच नाहीत तर तुम्हाला खूप विचार करायला भाग पाडतात. जर तुम्ही असल्या असली घटनांवर आधारित चित्रपटांचे चाहते असाल, तर हे 5 टॉप बॉलिवूड क्राइम थ्रिलर ओटीटीवर नक्की पाहा...

'तलवार' हा चित्रपट २००८ मधील आरुषी तलवार आणि हेमराज हत्याकांडावर आधारित आहे. चित्रपटात इरफान खान एक अशा तपासकर्त्याच्या भूमिकेत आहेत, जो १४ वर्षांच्या मुलीच्या हत्येच्या प्रकरणातील सर्व पैलू सोडवण्याचा प्रयत्न करतो. सोहा अली खान आणि रजत कपूर शोकग्रस्त आई-वडिलांच्या भूमिकेत आहेत. 'तलवार'ची खासियत म्हणजे त्याची कथा सांगण्याची पद्धत. हा चित्रप प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) वर पाहता येणार आहे.

'नो वन किल्ड जेसिका' हा क्राइम चित्रपट दिल्लीतील मॉडेल आणि बारटेंडर जेसिका लालच्या खऱ्या हत्येवर आधारित आहे. राजकुमार गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात रानी मुखर्जी, विद्या बालन, मायरा कर्ण यांच्यासह अनेक कलाकार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

'ब्लॅक फ्रायडे' हा चित्रपट १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट आणि त्यानंतरच्या तपासावर आधारित आहे, जो भारतातील सर्वात भयानक दहशतवादी हल्ल्यांपैकी एक आहे. चित्रपटात केके मेनन, पवन मल्होत्रा, आदित्य श्रीवास्तव आणि श्वेता मेनन यांच्यासह कलाकार आहेत. 'ब्लॅक फ्रायडे' तुम्ही यूट्यूबवर (काही चॅनेल्सवर पूर्ण उपलब्ध) किंवा इतर प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

'बाटला हाऊस' हा बॉलिवूड क्राइम ड्रामा दिल्लीतील २००८ च्या बाटला हाऊस मुठभेडीवर आधारित आहे. हा चित्रपट तणावपूर्ण कथेसाठी ओळखला जातो. ही कथा अंगावर अक्षरश: काटा आणणारी आहे. या हाय-स्टेक्स ड्रामामध्ये जॉन अब्राहम, मृणाल ठाकुर, मनोज पहवा, राजेश शर्मा आणि अपारशक्ती खुराना हे कलाकार आहेत. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहता येऊ शकते.

'रमन राघव 2.0' हा सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. या चित्रपटात कुख्यात सीरियल किलर रमन राघवची कथा दाखवण्यात आली आहे. १९६० च्या दशकात मुंबईत त्याने केलेल्या साखळी हत्यांनी खळबळ उडवली होती. चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकींनी रमन राघवची भूमिका साकारली आहे. तर विक्की कौशलने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. 'रमन राघव 2.0' यूट्यूब आणि झी५वर उपलब्ध आहे.