
Maruti Suzuki Dzire : सबकॉम्पॅक्ट डिझायरची किंमत 6.44 लाखांपासून 9.31 लाखांपर्यंत (एक्स शोरुम) दरम्यान आहे. या सेडानमध्ये LXi, VXi, ZXi आणि ZXi+ या चार ट्रिम लेव्हल येतात. यात VXi आणि ZXi ट्रिम्स फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह येतात. यात 1.2 लिटर ड्युलजेट पेट्रोल इंजिन पर्याय मिळतो. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन ट्रान्समिशन पर्यायासह येतो. (फोटो - Maruti Suzuki)

Honda Amaze : होंडा कंपनी अमेज हे दुसरं सेडान मॉडेल भारतात विकते. या सब कॉम्पॅक्ट अमेजची किंमत 6.99 लाख रुपये ते 9.60 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी आहे. E, S आणि VX ट्रिमसह येते. यात 1.2 लिटर पेट्रोल इंजिन पर्याय आहे. 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा सीव्हीटी गियरबॉक्ससह येतो. (फोटो- Honda)

Hyundai Aura : ह्युंदाई ऑरा देशातील लोकप्रिय सेडानपैकी एक आहे. या गाडीची किंमत 6.30 लाख रुपये ते 8.87 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. सब कॉम्पॅक्ट सेडान कार E, S , आणि SX (O) या ट्रिममध्ये येते. एस आणि एसएक्स ट्रिम लेव्हलमध्ये सीएनजी किट ऑप्शन आहे. (फोटो - Hyundai)

Tata Tigor : टिगॉर सेडानमध्ये XE, XM, XZ आणि XZ+ चार ट्रिम लेव्हल आहेत. यात एक्सएम, एक्सझेड आणि एक्सझेड प्लस ट्रिम लेव्हल सीएनजी किटसह आहे. सर्व ट्रिम लेव्हलमध्ये 1.2 लिटर तीन सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे. यात 5 स्पीड एएमटी किंवा 5 स्पीड एमटीसह आहे. (फोटो - TATA)

Maruti Suzuki Tour S : मारुती सुझुकी टूर एस एक स्वस्त सेडान कार आहे. ही गाडी 6.51 लाख रुपये (एक्स शोरूम) सुरु होते. यात 1.2 लिटर इंजिन आहे. यासोबत सेडानमध्ये सिंगल एअरबॅग, एअर कंडिशनर, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन आहे. (फोटो - Maruti)