6 एपिसोड्सची सीरिज, 25 दिवसांपासून लोकांची पहिली पसंत; IMDb वर दमदार रेटिंग
गेल्या चार आठवड्यांपासून सहा भागांची की वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होत आहे. या सीरिजच्या कथेत प्रत्येक वळणावर नवीन ट्विस्ट पहायला मिळतं. कथेतील सर्वांत मोठं रहस्य क्लायमॅक्सपर्यंत गुप्त ठेवलं जातं.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रत्येक आठवड्यात नवनवीन वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. यापैकी काही फ्लॉप होतात तर काही अनेक आठवड्यांपर्यंत ट्रेंडिंग यादीत आपलं स्थान टिकवून ठेवतात. सध्या अशीच एक कॉमेडी थ्रिलर वेब सीरिज चार आठवड्यांपासून ट्रेंडिंग यादीत कायम आहे. फक्त सहा एपिसोड्सच्या या सीरिजमध्ये विनोद, सस्पेन्स आणि दमदार ट्विस्टचं समीकरण पहायला मिळतं.

या सीरिजची सर्वांत खास गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत त्याचं रहस्य उलगडत नाही. एकदा का तुम्ही ही सीरिज बघायला सुरुवात केली तर शेवटपर्यंत तुम्ही खुर्चीला खिळून राहाल, इतकी दमदार याची कथा आणि त्यातील कलाकारांचं अभिनय आहे. जियो हॉटस्टारवर स्ट्रीम होणाऱ्या या वेब सीरिजचं नाव आहे 'प्रीतम अँड पेड्रो'.

3 जुलै रोजी ही वेब सीरिज जियो हॉटस्टारवर प्रदर्शित झाली. अजूनही ती ट्रेंडिंग यादीत कायम आहे. अर्शद वारसी आणि वीर हिरानी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजने सस्पेन्सने परिपूर्ण कथा आणि विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावर यातील बरेच सीन्स व्हायरल होत असून त्यामुळे लोकप्रियता आणखी वाढतेय.

या वेब सीरिजची कथा प्रीतम पार्कर आणि पेड्रो गोंसाल्वेस यांच्याभोवती फिरते. या दोघांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे त्याची कथा आणखी रंजक बनते. एका सायबर क्राइमच्या केसचा तपास करताना हे दोघं अशा रहस्यांपर्यंत पोहोचतात, जिथे प्रत्येक एपिसोडमध्ये नवीन ट्विस्ट पहायला मिळतो. हाच सस्पेन्स प्रेक्षकांना शेवटपर्यंच खिळवून ठेवतो.

जसजशी या सीरिजची कथा पुढे जाते, तसतसं हे उघड होतं की ज्या सायबर गुन्हेगाराचा शोध सुरू आहे, त्याचा संबंध प्रीतमच्या वैयक्तिक आयुष्याशीही आहे. त्यानंतर घटना वेगाने उलगडत जातात आणि प्रत्येक वळणावर नवीन रहस्ये समोर येतात. निर्मात्यांनी क्लायमॅक्सची रचना अशा प्रकारे केली आहे की शेवटच्या भागापर्यंत उत्कंठा कायम राहते. आयएमडीबीवर या सीरिजला दहापैकी 7.8 रेटिंग मिळाली आहे.