
मुंबई कामाला असणाऱ्या लोकांसाठी ही बातमी कामाची आहे. कारण काही दिवसात पुन्हा काम येण्याचा प्लान असेल. तर ही ठिकाणं तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरतील.

माथेरान : या ठिकाण मुंबईच्या अगदी जवळ आहे. अवघ्या काही तासात या ठिकाणी जाता येतं. मिनी महाबळेश्वर म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. ही शांत, निगर्गरम्य असल्याने नक्कीच मन प्रसन्न होईल.

महाबळेश्वर : मुंबई जवळचं सर्वात लोकप्रिय हील स्टेशन आहे. अल्हादायक वातावरणामुळे फिरण्याची मजा काही औरच आहे. या ठिकाणी नीडल होल पॉईंट, विल्सन पॉईंटसारखी ठिकाणं आहेत. त्यामुळे हे ठिकाणही बेस्ट पर्याय ठरेल.

लोणावाळा : मुंबईच्या जवळचं असलेलं लोणावळा आणि खंडाळा हा देखील बेस्ट पर्याय ठरेल. निगर्सरम्य ठिकाण असून काही वॉटरफॉल या ठिकाणी पावसाळ्यात पाहायला मिळतात. तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मानसिक सुख मिळेल.

अलिबाग : समुद्र किनाऱ्यावर फिरायला जायचं असेल तर मुंबईत काही ठिकाणं आहेत. पण त्यातल्या त्यात अलिबागला जाणं बेस्ट पर्याय ठरेल. या ठिकाणी तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटू शकता.