सोन्यावाणीच चमकले या देशाचे नशीब! सोने-चांदीचा मिळाला खजिना

South America Country Gold Jackpot : या देशाच्या हाती मोठा खजिना लागला आहे. त्यामुळे या गरीब देशाला लॉटरी लागली आहे. येथील खाणीमधून सोनेच नाही तर चांदी आणि तांब्याचा मोठा साठा आढळून आला आहे.

| Updated on: Sep 02, 2025 | 5:42 PM
1 / 6
अर्जेंटीना हे नाव ऐकल्यावर पहिल्यांदा आठवतो तो फुटबॉल, लियोनल मेसी आणि डिएगो माराडोना. दक्षिण अमेरिकेतील या देशाचा सर्वाधिक सामना हा आर्थिक संकटाशी होतो. पण लवकरच या देशाचा चेहरामोहरा बदलणार आहे.

2 / 6
या दक्षिण अमेरिकेतील देशाच्या हातात एक मोठा खजिना लागला आहे. देशातील सेंट जॉन राज्यात सोने, चांदी आणि तांब्याची मोठी खाण हाती लागली आहे. या देशाचे नशीब आता बदलणार आहे.

3 / 6
अर्जेंटिनाच्या सीमावर्ती भागात, चिली या देशाच्या शेजारी हा खजिना मिळाला आहे. गेल्या 30 वर्षांतील हा या देशासाठीची सर्वात मोठी आनंदवार्ता असल्याचे सांगण्यात येते.

4 / 6
एका अंदाजानुसार, या खाणीतून 12 दशलक्ष टन म्हणजे जवळपास 1.2 कोटी टन तांबे, जवळपास 80 लाख औस म्हणजे सव्वा दोन लाख किलो सोने आणि चांदी असल्याचे सांगण्यात येत आहे.

5 / 6
हा देश कृषी प्रधान आहे. येथे फुटबॉल हाच धर्म आहे. पण तरीही हा देश आर्थिक संकटाचा सातत्याने सामना करत आहे. त्यांच्यासाठी हा खजिना मिळाला आहे.

6 / 6
अर्थात हा खजिना बाहेर काढण्यासाठी पर्यावरण नियमांचे पालन करावे लागणार आहे.  मे च्या अखेरीस हा शोध लागला आहे. दक्षिण अमेरिकेतील खाण आणि खनिज क्षेत्रात ही अमुलाग्र क्रांती मानण्यात येत आहे.