याशिवाय पर्याय नाहीच, तुकाराम मुंढे बोलले स्पष्टच, तुम्ही, मी, आपली मुले, नातेवाईक..

तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. त्यामध्येच तुकाराम मुंढे यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. हेच नाही तर निरोगी भारत यावरही ते बोलताना दिसत आहेत.

| Updated on: Aug 19, 2026 | 6:23 PM
1 / 5
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्याकडून मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. धडाकेबाज कारवाया त्यांच्या विभागाकडून सुरू आहेत. 

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्याकडून मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. धडाकेबाज कारवाया त्यांच्या विभागाकडून सुरू आहेत. 

2 / 5

तुकाराम मुंढे यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी लोकांच्या पाठिंब्यावर मोठे भाष्य केले. तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, माझा असा दृष्टिकोन आहे की, आपला विभाग जे काम करत आहे, त्याचे रूपांतर एका लोकचळवळीत झाले पाहिजे.

3 / 5

ही बाब प्रत्येकासाठी म्हणजेच तुम्ही, मी, आपली मुले, नातेवाईक आणि प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. जर आपल्याला भारताला महासत्ता बनवायचे असेल, तर निरोगी भारत असल्याशिवाय ते साध्य अजिबात शक्य नाही. 

4 / 5

नागरिकांचे उत्तम आरोग्य महत्वाचे आहे. आपण सेवन करत असलेले अन्न आणि घेत असलेली औषधे ही आरोग्यदायी, प्रभावी, सुरक्षित आणि निर्धारित मानकांनुसार असणे गरजेचे आहे.

5 / 5

तुकाराम मुंढे यांनी पुढे म्हटले की, आम्ही या दिशेने काम करत आहोत आणि यात सहभागी होणे तसेच कोणत्याही अनियमिततेबाबत माहिती देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us