
तुळशीचं पानं उन्हाळ्यात जांभळ्या रंगाची होतात. पण पावसाळा सुरु झाला की त्यांचा रंग पुन्हा बदलतो. ही पानं हिरवी होऊ लागतात. उन्हात ठेवलेल्या तुळशीच्या पानात हा फरक दिसून येतो. पण तुळशीच्या पानांचा रंग बदलण्याचं कारण काय? चला जाणून घेऊयात. (फोटो: Pixabay)

जांभळ्या रंगाची पानं असलेल्या तुळशीला कृष्ण तूळस म्हंटलं जातं. तुळशीच्या पानांचा रंग बदलण्याचे कारण रंगद्रव्य आह. या रंगद्रव्याचे नाव अँथोसायनिन आहे. हे रंगद्रव्य तुळशीच्या पानांना जांभळा रंग देते. जास्त सूर्यप्रकाश असलेल्या दिवसांत हे रंगद्रव्य जास्त तयार होते. उन्हाळ्याच्या दिवसांत हिरव्या तुळशीची पाने जांभळी होण्याचे हेच कारण आहे. (फोटो: Pixabay)

पावसाळ्यात तापमान कमी होते. या हवामान बदलाचा परिणाम जांभळा रंग देणाऱ्या रंगद्रव्यावरही होतो. रंगद्रव्य कमी होते आणि जांभल्या रंगाची पाने पुन्हा हिरवी दिसू लागतात. शास्त्रज्ञांच्या मते, ऋतु बदलाचा वनस्पतीवर परिणाम होतो. (फोटो: Pixabay)

भारतात हिरव्या रंगाच्या तुळशीला राम तूळस म्हणतात. तर जांभळ्या रंगाची तूळस ही कृष्ण तूळस म्हणून संबोधली जाते. वैज्ञानिकांच्या मते, जांभळ्या रंगाची पानांचा अर्थ वनस्पती उच्च तापमानाशी झुंज देत आहे. त्याला सावळी किंवा पाण्याची आवश्यकता आहे. (फोटो: Pixabay)

तुळशीचे रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल. थेट सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी ते ठेवू नका. यामुळे तुळशी सुकण्याचा धोका वाढतो. वेळोवेळी त्याला पाणी द्या आणि त्याची काळजी घ्या. पावसाळ्यात अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला पुरेसे पाणी मिळेल. पण कुंडी पाण्याने भरलेली असेल तर ते काढून टाका अन्यथा झाड कुजण्याचा धोका असतो. (फोटो: Pixabay)