
पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देणे तुर्कीला खूप महागात पडले आहे. भारतात 'बायकॉट तुर्की' (Boycott Turkey)' मोहीम तीव्र झाली आहे, ज्याचा परिणामही दिसून येत आहे. मात्र हा इस्लामिक देश इतर अनेक कारणांमुळेही अनेक चर्चेत राहिला आहे. यापैकी एक तुर्कीमध्ये स्थित एक प्राचीन मंदिर (हिरापोलिस येथील प्लुटोनियम) आहे, ज्याला 'नरकाचे प्रवेशद्वार' असेही म्हणतात. (Photos : Getty Images)

या मंदिराबद्दल असे म्हटले जाते की येथे जो कोणी जातो, तो परत येत नाही! या मंदिराच्या संपर्कात आल्याने केवळ मानवच नाही तर प्राणी आणि पक्षी देखील मरतात, असेदेखील म्हणतात.

रहस्यमय मृत्यूंनंतर, हे'प्लूटोचे मंदिर' म्हणजेच 'मृत्यूच्या देवाचे मंदिर' म्हणून ओळखले जाऊ लागले. ग्रीक आणि रोमन काळात लोक याला ग्रीक देवाच्या विषारी श्वासाचा प्रकोप मानत होते.

मात्र, आधुनिक विज्ञानाने हे रहस्य उलगडले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, मंदिराच्या खालून विषारी कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडतो, ज्यामुळे मृत्यू होतो.

गुहेत विषारी वायूंचे प्रमाण 91 टक्के आहे, असे त्यांनी सांगितलं. तर, 10 टक्के कार्बन डायऑक्साइड कोणत्याही माणसाला मारण्यासाठी पुरेसा आहे.