
राज्यात राजकीय घडामोडींचा धुराळा उडालेला असतानाच मराठी मनोरंजन इंडस्ट्रीतून आनंदाची बातमी आली आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतली फेमस जोडी शेवटी खरोखरच जीवन बंधनात अडकली आहे.

अक्षरा देवधर आणि हार्दीक जोशी यांनी साखरपुडा केला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटोज शेअर केले आहेत,

सोशल मीडियावर दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आले त्यावेळेस त्यावर विश्वास बसला नाही ही कुठल्या तरी प्रोडक्टची किंवा मालिकेची सुरुवात तर नाही ना असं वाटले. पण थोडा वेळ गेल्यानंतर दोघांच्या अकाऊंटवरुन फोटो शेअर झाले आणि शेवटी बातमी पक्क झाली

अक्षराने फोटो शेअर करताना अहाSS फायनली Engaged असे शब्द टाकले आहेत. कदाचित रिल लाईफमध्ये जे काही घडलं ते रिअल लाईफमध्येही घडेल यावर तिचा विश्वास नसावा. त्यामुळेच एवढा गोड सोहळा तिला स्वप्नवत वाटत असावा. फायनली ती एंगेज झाली आहे हेच खरं.