
प्रसिद्ध अभिनेत्री जिया शंकर हे सतत चर्चेत असणारे नाव आहे. अभिनेत्रीचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्यात अनेक चढउतार बघितले आहेत. डिप्रेशनमध्ये अभिनेत्री गेली होती.

जिया शंकर म्हणाली की, मी माझ्या आयुष्यात खूप जास्त वाईट दिवस बघितले आहेत. माझ्या आईने एकटीनेच माझा सांभाळ केला. काही गोष्टींचा त्यावेळी माझ्या मनावर खूप परिणाम झाला.

त्यावेळी कोणालाच कळत नव्हते की, माझ्या मनात काय सुरू आहे. मी थेरेपी देखील घेतल्या आहेत. इथे कोणी मेंटल हेल्थवर बोलतच नाही. डिप्रेशन काय असते याबद्दल चर्चाच होत नाही.

जेंव्हा तुमच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येतो त्यावेळी तुम्हाला देखील कळत नाही. आज त्या तुलनेत डिप्रेशनवर तसे बोलले जाते. डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी मी थेरपी घेतल्याचेही तिने म्हटले.

जिया शंकर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच जया शंकर ही दिसते.