
मानिनी डे ही नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. मानिनीने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. जबरदस्त अशी तिची फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

नुकताच मानिनी डे हिने मोठा खुलासा केलाय. मानिनी डे म्हणाली की, मला माझे करिअर महत्वाचे होते आणि त्यामुळे माझे माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले.

माझे पहिले लग्न कमी वयात झाले. त्यानंतर काही दिवस हे लग्न टिकले आणि पती सोडून गेला. त्यानंतर मी विचार केला की, या लग्नानंतर मला काय भेटले तर माझी मुलगी भेटली.

परंतू माझी मुलगी देखील काही दिवसांमध्येच मला सोडून तिच्या वडिलांकडे गेली. पहिल्या घटस्फोटानंतर माझी ओळख मिहिर मिश्रासोबत झाली. दहा दिवसांमध्येच आम्ही लग्न केले.

आमचे लग्न 15 वर्षे टिकले. परंतू मी वेळ देऊ शकत नव्हते. मला वाटले की, आमची साथ फक्त इतकीच होती. पहिल्यांदाच अभिनेत्री आपल्या पर्सनल लाईफबद्दल बोलताना दिसली.