ऑफ-शोल्डर गाऊनमधील ही अभिनेत्री कोण? सौंदर्य पाहून चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचा ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये ग्लॅमरस लूक. पोज पाहून चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव. कोण आहे ती?

| Updated on: Oct 04, 2026 | 6:04 PM
1 / 5
टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कृष्णाईच्या लेकी’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेतील कलाकार आणि त्यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कृष्णाईच्या लेकी’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेतील कलाकार आणि त्यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

2 / 5

अभिनेत्री ट्विंकल यादव हिने साकारलेली ‘गौरी’ ही व्यक्तिरेखाही अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहे. ट्विंकलने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ‘गौरी’च्या भूमिकेला वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

3 / 5

मालिकेतील अभिनयासोबतच ट्विंकल सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. ती अनेकदा आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

4 / 5

नुकतेच ट्विंकलने सोशल मीडियावर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा हटके आणि स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे. ट्विंकलने गुलाबी रंगाचा सुंदर ऑफ-शोल्डर नेटेड गाऊन परिधान केला आहे.

5 / 5

ट्विंकलच्या या नव्या लूकवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिच्या सौंदर्याचं आणि स्टायलिश अंदाजाचं कौतुक केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us