एकाला 50000 तर एकाला 25000 रुपये पगार, दोघांपैकी श्रीमंत कोण? कसं ओळखाल?
मानवी जीवनात सुखी, समाधानी आयुष्य म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीला 50000 रुपये पगार असेल आणि अन्य व्यक्तीला 25000 रुपये पगार असेल तर साहजिकच 25000 हजार रुपये पगार असणारी व्यक्ती गरीब आहे, असे अनेकजण म्हणतील.

आजकाल श्रीमंती आणि समाधान यातील फरक धुसर होत चालला आहे. एखाद्या व्यक्तीकडे जास्त पैसे असले की ती खूपच सुखी आणि आनंदी आहे, असे समजले जाते. विशेष म्हणजे जास्त पगार असणाऱ्या व्यक्तीला समाजात मानही तेवढाच मिळतो.

दरम्यान, मानवी जीवनात सुखी, समाधानी आयुष्य म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीला 50000 रुपये पगार असेल आणि अन्य व्यक्तीला 25000 रुपये पगार असेल तर साहजिकच 25000 हजार रुपये पगार असणारी व्यक्ती गरीब आहे, असे अनेकजण म्हणतील.

परंतु मोठा पगार असणे आणि श्रीमंत असणे यात खूप फरक आहे. श्रीमंतीचे तुमचे मापदंड काय आहेत? यावरुनही खूप काही ठरते. एखादी व्यक्ती महिन्याला 50000 रुपये पगार कमवत असेल आणि तीच व्यक्ती 40 हजार रुपये फक्त EMI भरण्यासाठी देत असेल तर त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने श्रीमंत म्हणता येणार नाही.

याउलट 25000 हजार रुपये पगार असणारी व्यक्ती आपल्या अर्ध्या पगारापेक्षा जास्त रक्कम जर योग्य ठिकाणी गुंतवत असेल. अर्ध्या पेक्षा जास्त पैशांचा ती व्यक्त योग्य वापर करत असेल तर तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे, असे मानता येईल.

आलिशान जीवन जगत असल्याचे दाखवणे आणि तणावमुक्त, चिंताविरहित आयुष्य जगणे यात खूप फरक आहे. जी व्यक्ती तणावमुक्त जीवन जगते, कर्जाच्या ओझ्याखाली नाही, आयुष्याचा मनमुराद आनंद लुटते, अशी व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे, असे मानता येईल.