
राज्यातील गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. सामान्य नागरिकांसह नेत्यांच्याही घरी गणरायाचे आगमन झाले आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवास्थानी बाप्पा विराजमान झाले आहेत.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आज उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या शीवतीर्थ या निवासस्थांनी जात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी दोन्ही कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत वरळीचे आमदार आदित्य ठाकरेही शिवतीर्थावर पोहोचले होते. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात 10 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

आज उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. सध्या दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चा सुरु आहे, त्यामुळे गणपती बाप्पा ठाकरे बंधुंना पावणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही राज ठाकरेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.