Vaibhav Suryavanshi Century : फायनलमध्ये वैभव सूर्यवंशी इंग्रजांवर तुटून पडला, खणखणीत शतक, 8 फोर, 8 सिक्स

Vaibhav Suryavanshi Century : ICC मेन्स अंडर 19 वर्ल्ड कप 2026 ची फायनल सुरु आहे. अंतिम फेरीत भारतासमोर इंग्लंडच आव्हान आहे. हरारेमधील हरारे स्पोर्ट्स क्लबवर फायनल मॅच सुरु आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा युवा ओपनर वैभव सूर्यवंशीने हा निर्णय योग्य ठरवला.

| Updated on: Feb 06, 2026 | 3:31 PM
1 / 5
 वैभव सूर्यवंशी आणि वेदांत त्रिवेदीची जोडी क्रीजवर आहे. भारतीय टीम सलग सहाव्यांदा आणि 10 वी अंडर 19 वर्ल्ड कप फायनल खेळत आहे. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

2 / 5
पाचवेळा अंडर 19 वर्ल्ड कपच जेतेपद पटकावणाऱ्या टीम इंडियाचं लक्ष्य विजयी षटकार मारण्याचं आहे. भारतीय टीमने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये वर्ल्ड कप फायनल जिंकली आहे. दुसरीकडे इंग्लंडच्या टीमने फक्त एकदाच अंडर 19 वर्ल्ड कप जिंकलाय. 1998 साली त्यांनी फायनलमध्ये न्यूझीलंडला हरवलं होतं.

3 / 5
वैभव सूर्यवंशीने वर्ल्ड कप फायनलमध्ये दमदार शतक झळकावलं आहे. वैभवने फक्त 55 चेंडूत तुफानी शतक ठोकलं. वैभवचं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये हे पहिलं शतक आहे. टुर्नामेंटच्या इतिहासातील फायनलमधील हे सर्वात वेगवान शतक आहे. वैभवने हे शतक झळकवताना 8 फोर आणि 8 सिक्स मारल्या.

4 / 5
 भारतीय अंडर-19 क्रिकेट टीमचा ओपनर वैभव सूर्यवंशीने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडलाय. आपल्या पहिल्याचा वर्ल्ड कपमध्ये त्याने ही कमाल केलीय.

5 / 5
वैभव सूर्यवंशीने सेमीफायनल नंतर फायनलमध्ये सुद्धा अर्धशतक फटकावलं. त्याने अवघ्या 32 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अंडर 19  वर्ल्ड कप 2026 मधील त्याचं हे चौथं अर्धशतक आहे.