रेल्वेवर दगड भिरकावला, 5 वर्षीय चिमुकली मृत्युमुखी, सोलापुरात नेमकं काय घडलं?

सोलापूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका अज्ञाताने चालत्या रेल्वेवर भिरकावलेल्या दगडामुळे पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

| Updated on: Apr 20, 2025 | 7:09 PM
1 / 5
सोलापूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका अज्ञाताने चालत्या रेल्वेवर भिरकावलेल्या दगडामुळे पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

सोलापूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका अज्ञाताने चालत्या रेल्वेवर भिरकावलेल्या दगडामुळे पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

2 / 5
आरोही अजित कांगले असे 5 वर्षीय मृत्युमुखी पडलेल्या मुलीचं नाव आहें. कुलदैवताच्या यात्रेवरून सोलापूरला परतत असताना ही घटना घडली आहे.

3 / 5
या चिमुकलीचे पालक विजयपूर ते रायचूर पॅसेंजर एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. त्याच वेळी एका अनोळखी व्यक्तीने चालत्या रेल्वेवर एक दगड भिरकावला. यातच या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

4 / 5
 सोलापुरातील टिकेकरवाडी स्टेशनपासून काही अंतरावर ही गंभीर घटना घडली आहे. या घटनेनंतर  चिमुकलीला उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

5 / 5
दरम्यान चिमुकलीच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चिमुकलीच्या कुटुंबीयांनी केली आहे. (टीप- हे सर्व फोटो काल्पनिक आहेत. फोटो क्रेडिट- मेटा एआय)