
अभिनेत्री उर्फी जावेदचा 'फॉलो कर लो यार' हा शो बराच चर्चेत आहे. या शोमध्ये उर्फीने तिच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे केले आहेत. उर्फीने तिच्या लव्ह-लाइफवरूनही पडदा उचलला आहे. एका एपिसोडमध्ये तिने म्हटलंय की गेल्या तीन वर्षांपासून ती सिंगल आहे.

उर्फी तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. या शोमध्येही तिने तिच्या खासगी आयुष्याविषयी बेधडकपणे खुलासे केले आहेत. "मी गेल्या तीन वर्षांपासून कोणासोबत सेक्स केला नाही. इतकंच काय तर तीन वर्षांत मी कोणत्या मुलाला किससुद्धा केलं नाही. मी कोणाशी रोमँटिक गप्पासुद्धा मारल्या नाहीत", असं ती म्हणाली.

या शोमध्ये उर्फी यामागचं कारणसुद्धा सांगितलं आहे. ती पुढे म्हणाली, "मी सेक्स का करत नाही, यामागचंही एक कारण आहे. मी तीन वर्षांपूर्वी स्वत:शीच एक निर्धार केला होता. जोपर्यंत उर्फीजवळ नसेल प्रायव्हेट जेट, तोपर्यंत उर्फी कोणाशीच होणार नाही इंटिमेट.."

"मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एकटीनेच केली आहे. मी कोणावरच अवलंबून नाही. त्यामुळे भविष्यात मी माझ्या पार्टनरसमोर कोणत्याही बाबतीत कमी ठरणार नाही", असंही ती म्हणाली.

याआधी उर्फी जावेदचं नाव टीव्ही अभिनेता पारस कलनावतशी जोडलं गेलं होतं. मात्र काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी 2017 मध्ये ब्रेकअप केलं होतं. तेव्हापासून उर्फी सिंगलच आहे.