
Urfi Javed

अभिनेत्री राखी सावंत ही बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाते. राखी सावंत नेहमी चर्चेत असते. ती लोकांचं लक्ष वेधून घेण्याची एकही संधी सोडत नाही. काही दिवसांपूर्वीच राखीने स्पायडर मॅनचा ड्रेस घातला होता. तसंच हा ड्रेस घालून ती विचित्र पद्धतीने कॅमेऱ्यात कैद झाली होती. तिच्या या अतरंगी लूकनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्रा तिच्या अभिनय आणि लूकमुळे अनेकदा चर्चेत असते. प्रियांकाने तिच्या अभिनयाचा ठसा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील उमटवला आहे. प्रियांका चोप्रा ही आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये अनेकदा अतरंगी शैलीत दिसली आहे.

छोटी बहू मालिकेतून आणि बिग बॉस 16 मधून घराघरात प्रसिद्ध झालेली रुबीना दिलैक सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तसंच अनेकदा ती सोशल मीडियावर तिची अनोखी फॅशन दाखवताना दिसते. काही दिवसांपूर्वीच रूबीनाचे नागाच्या रूपातले फोटो व्हायरल झाले होते. रुबीनानंही स्टाईलच्या बाबतीत उर्फीलाही अनेक वेळा मागे टाकले आहे.

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच चर्चेत असते. तिचे चाहतेही लाखोंच्या संख्येत आहेत. दीपिका जितकी सुंदर आहे तितकीच ती स्टायलिशही आहे. तिच्या फॅशन स्टाईलची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. पण काही वेळा दीपिका तिच्या अतरंगी फॅशनमध्येही दिसली आहे. एका ॲवॉर्ड शोमध्ये ती विचित्र स्टाइलमध्ये दिसली होती.

अभिनेत्री एली अवराम ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती नेटकऱ्यांसोबत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ती तिचे सौंदर्य दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. तसंच एली अवराज ही तिच्या बोल्ड आणि विचित्र फॅशन स्टाईलमुळे ओळखली जात असून तिच्या हॉट फोटोंपुढे उर्फी जावेदचे फोटो एकदम फिके दिसतात.