Uttarkashi cloudburst : डोंगरातून आला मृत्यू, घर-दुकान, माणूस क्षणात सगळे गायब, PHOTO पाहून हादरुन जालं

Uttarkashi cloudburst : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये विद्ध्वसाच भयानक रुप पहायला मिळालं. निसर्गाचा कोप म्हणजे काय असतो? निसर्ग रौद्ररुप धारण करतो, तेव्हा किती भयानक असतो ते दिसून आलं. हे फोटो पाहून तुम्ही हादरुन जालं.

| Edited By: | Updated on: Aug 05, 2025 | 4:10 PM
1 / 5
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात हादरवून सोडणारी घटना घडली आहे. हर्षिलमध्ये अचानक ढगफुटी झाली. त्यामुळे खीर गाडचा जलस्तर वाढला. मोठ्या प्रमाणात ढिगारा धराली गावाकडे वाहत आला. त्याच्या कोसळण्याच्या मार्गात अनेक घरं आली. बघता, बघता क्षणात सगळं उद्धवस्त झालं.

2 / 5
या नैसर्गिक संकटाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतय, अवघ्या 20 सेकंदात सगळं उद्धवस्त झालं. लोक भितीपोटी ओरडताना दिसत होते. अचानक आलेल्या या संकटाने सगळ्या भागाला हादरवून सोडलं.

3 / 5
या दुर्घटनेत 60 जण बेपत्ता झाल्याची शक्यता आहे. ढिगारा आणि पुराचं पाणी अनेक घरं आणि हॉटेलमध्ये घुसलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. धराली मार्केट क्षेत्रात पाणी आणि ढिगाऱ्यांमुळे अनेक दुकानांच नुकसान झालं. स्थानिक लोक आपल्या आप्तस्वकीयांच्या शोध लागत नसल्याने चिंतेत आहेत.

4 / 5
या घटनेची सूचना प्रशासनाला मिळताच त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरु केलं. भटवाडीतून एसडीआरएफची टीम तात्काळ धरालीला रवाना झाली. त्याशिवाय स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. बचाव पथकाने फसलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचा काम सुरु केलय.

5 / 5
उत्तरकाशी पोलिसांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म X वर लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलय. खीर गाडचा जलस्तर वाढल्यामुळे धरालीमध्ये नुकसान झाल्याची सूचना आहे. SDRF आणि आर्मी घटनास्थळी आहे. पोलिसांनी स्थानिक लोकांना आवाहन केलय की, त्यांनी नदी आणि नाल्याजवळ जाऊ नये.