
राधिका राजे त्यांच्या कुटुंबासह लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये राहतात, ज्याची किंमत 25 हजार कोटी आहे. हा पॅलेस ब्रिटनच्या किंग चार्ल्सच्या बकिंगहॅम पॅलेसपेक्षा चार पट मोठा आहे.

लक्ष्मी विलास पॅलेस, ज्याला वडोदरा पॅलेस म्हणूनही ओळखलं जात. 1890 मध्ये बांधण्यात आलेला हा पॅलेस 30 लाख चौरस फूट क्षेत्रात पसरलेला आहे आणि त्याची रचना ब्रिटिश अभियंता मेजर चार्ल्स मंट यांनी केली होती.

या भव्य राजवाड्यात 170 हून अधिक खोल्या, एक खाजगी गोल्फ कोर्स आणि शाही इतिहासाने भरलेले संग्रहालय आहे. या पॅलेसच्या तुलनेत मुकेश अंबानींचे अँटिलिया 48,780 चौरस फूट आहे, तर लक्ष्मी विलास पॅलेस अँटिलियाला देखील मागे टाकतो.

स्वत: पत्रकार असलेल्या महाराणी राधिका राजे गायकवाड यांनी 2002 मध्ये महाराजा समरजित सिंग गायकवाड यांच्याशी विवाह केला. समरजीत सिंह गायकवाड हे क्रिकेटपटू होते.

हा राजवाडा चार मजली उंच आहे आणि सुमारे 700 एकर क्षेत्रात पसरलेला आहे. प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ सर विल्यम गोल्डरिंग यांनी डिझाइन केलेल्या सुंदर बागांनी वेढलेला आहे.

विशेष म्हणजे सामान्य लोकही हा राजवाडा पाहू शकतात. फक्त150 रुपयांचं तिकीट काढून तुम्ही राजवाड्याला भेट देऊ शकता. जर तुम्हाला येथील संग्रहालय देखील पहायचे असेल तर तुम्हाला अतिरिक्त 150 रुपये द्यावे लागतील.