Vaibhav Sooryavanshi : मला पाहायचंय तो कसं खेळतो! वैभव सूर्यवंशीला कोणी दिलं खुलं चॅलेंज?

न्यूझीलंड विरुद्ध 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे. न्यूझीलंडच्या वेगवान आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर वैभव दबावाच्या परिस्थितीत कशी फलंदाजी करतो, याकडे त्यांचे लक्ष असणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

| Updated on: Sep 23, 2026 | 7:29 PM
1 / 5
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऑक्टोबरमध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी भारताचा १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला खुले आव्हान दिले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऑक्टोबरमध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी भारताचा १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला खुले आव्हान दिले आहे.

2 / 5

वॉल्टर यांनी म्हटले आहे की, न्यूझीलंडच्या वेगवान आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर वैभव कशी फलंदाजी करतो, हे पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत. दबावाच्या परिस्थितीत आणि वेगळ्या वातावरणात तो स्वतःला कसा सिद्ध करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

3 / 5

आयपीएल तसेच अंडर-१९ विश्वचषकात जगातील सर्वोत्तम गोलंदाजांची धुलाई करत वैभवने आपली प्रतिभा दाखवून दिली आहे, असे म्हणत वॉल्टर यांनी त्याचे कौतुकही केले. पण आता परदेशी परिस्थितीत तो कसा खेळतो, यावर त्याची कसोटी असेल.

4 / 5

वैभवने जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध टी-२० पदार्पण केले होते. मात्र, त्यानंतर नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तान आणि जपानविरुद्धच्या सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग-११ मध्ये संधी मिळाली नव्हती. त्यामुळे न्यूझीलंडच्या आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर त्याला संघात स्थान मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

5 / 5

टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अहमदाबाद येथे भारतीय संघाकडून मिळालेल्या दारुण पराभवानंतर न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदाच भारताशी टी-२० क्रिकेटमध्ये भिडणार आहे. त्यामुळे या मालिकेत दमदार पुनरागमन करून त्या पराभवाचा बदला घेण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us