वैभव सूर्यवंशी रोहित शर्मापेक्षा भारी? आकडे वाचून तुम्हीही व्हाल चकित!
वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत एकूण 28 टी-20 क्रिकेटचे सामने खेळलेले आहेत. तर रोहत शर्माने आतापर्यंत टी-20 चे 468 सामने खेळलेले आहेत. अशा स्थितीत रोहित आणि वैभव यांनी खेळलेल्या 28-28 सामन्यांची तुलना करुयात. या सामन्यांत कोणी किती धावा केल्या ते जाणून घेऊ.

वैभव सूर्यवंशी या तरुण खेळाडूची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. तो सध्या राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळत असून मैदानावर तुफान फलंदाजी करताना दिसतोय. दरम्यान, तो भविष्यातील महान फलंदाज असेल असे बोलले जात आहे. म्हणूनच रोहित शर्माच्या तुलनेत तो कुठे आहे, ते जाणून घेऊ या...

वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत एकूण 28 टी-20 क्रिकेटचे सामने खेळलेले आहेत. तर रोहत शर्माने आतापर्यंत टी-20 चे 468 सामने खेळलेले आहेत. अशा स्थितीत रोहित आणि वैभव यांनी खेळलेल्या 28-28 सामन्यांची तुलना करुयात. या सामन्यांत कोणी किती धावा केल्या ते जाणून घेऊ.

वैभव सूर्यवंशीने 28 टी-20 सामन्यांत फलंदाजी करून 40.92 च्या सरासरीने एकूण 1105 धावा केल्या. तर रोहित शर्माने 28 सामन्यांत 25 वेळा फलंदाजी करून 39.78 च्या सरासरीने 756 धावा केल्या. त्याने एकूण 28 सामन्यांत एकूण 4 वेळा शतक आणि तीन वेळा अर्धशतक लगावले आहे.

रोहित शर्माने 28 टी-20 सामन्यांत एकूण एक शतक आणि 5 अर्धशतकं लगावली आहेत. वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत टी-20 सामन्यात एका डावात सर्वाधिक 144 धावा केलेल्या आहेत. तर रोहित शर्माने एका डावात सर्वाधिक 101 धावा केलेल्या आहेत.

वैभव सूर्यवंशीने 28 टी-20 सामन्यांत 88 चौकार तर 99 षटकार लगावलेले आहेत. रोहित शर्माबाबत बोलायचे झाल्यास त्याने 28 टी-20 सामन्यांत 74 चौकार आणि 34 षटकार लगावलेले आहेत. 28 सामन्यांतील वैभवच्या धावांचे स्ट्राईक रेट 215.39 आहे. तर रोहितचे स्ट्राईक रेट 144 आहे.