Varsha Usgaonkar: मराठी चित्रपट गाजवले तरीही ती इच्छा अपूर्णच, वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केली मनातली सल
Varsha Usgaonkar News: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री वर्षा उसगांवकरने आता मनीतली एक सल बोलून दाखवली आहे .

मराठी सिनेसृष्टीची एव्हरग्रीन अभिनेत्रींपैकी एक म्हणजे वर्षा उसगांवकरांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनाच एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एक खंत बोलून दाखवली आहे.
वर्षा उसगांवकर यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या," माझ्या आईने मला दोन गोष्टींसाठी अप्रिशिएट केलंय, एक तर अभिनय आणि दुसरं म्हणजे माझं गाणं, तिला खूप आनंद होतो की तिची जी कला आहे ती घ्यावी."
"मी अभिनय तिच्याकडून घेतलेला नाही, तो मी माझ्या वडिलांकडून घेतले, त्यांना अभिनयाचे फार वेड होतो. त्यांना हिरो व्हायचे होते. त्यामुळे मला माझ्या आईने अभियसाठी तर अप्रिशिएट केलेच पण त्यापेक्षा जास्त गाण्यासाठी केले." असं वर्षा उसगांवकर म्हणाल्या.
माझी आई म्हणाली तू चांगली गायिका झाली असती, जर तू ते गांभीर्याने केले असते तर नक्कीच तू एक चांगली गायिका झाली असती, माझ्या वडिलांनी मला गाण्याचा क्लास लावला होता. पण रियाज वगैरे नीट न झाल्याने गाणं मागेच पडले. " अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
वर्षा उसगांवकर यांनी मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांतही काम केले आहे. बिगबॉस मराठीमध्ये ही त्या स्पर्धक म्हणून सामील झाल्या होत्या.