जावळीच्या जंगलामधील एक अनोखं दुर्गरत्न; घनदाट जंगलातला वासोटा किल्ला

| Updated on: Jan 12, 2024 | 8:17 AM

वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी बामणोली इथून बोटीतून प्रवास करावा लागतो. कोयना धरणाच्या बॅक वॉटरमधून बोटिंग करत जाताना हा अत्यंत सुंदर निसर्ग पहायला मिळतं. बोटिंगनंतर किल्ल्याच्या दिशेने पायी प्रवास करावा लागतो. हा प्रवास जवळपास अडीच ते तीन तासांचा आहे.

1 / 5
ट्रेकर्सचे पाय कितीही थकले असले तरी भविष्यात कोणता गड सर करायचा याची प्लॅनिंग सतत सुरूच असते. ट्रेकर्सना खुणावणारा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येईल असा किल्ला म्हणजे वासोटा. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/ आदित्य चव्हाण)

2 / 5
नैसर्गिक दुर्गमता लाभलेला असा हा वासोटा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखं दुर्गरत्‍न आहे. वासोटा किल्ला ज्या डोंगरावर आहे तिथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने आपल्या गुरूच्या नावावर वसिष्ठ असं ठेवलं असेल अशी आख्यायिका आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/ आदित्य चव्हाण)

3 / 5
कालांतराने याचं नाव वासोटा असं पडलं असावं असं म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी वासोटा किल्ल्याचं नाव व्याघ्रगड असं ठेवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत या गडाचा वापर कैदी ठेवण्यासाठी केला जात असे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/ आदित्य चव्हाण)

4 / 5
सातारा जिल्ह्यात वसलेलं हे ठिकाण ट्रेकर्सचा प्रवास अनुभव नक्कीच अविस्मरणीय करेल. घनदाट जंगलाचा अनुभव घेत या किल्ल्याची भटकंती करता येते. साहसी ट्रेकची आवड असणाऱ्यांसाठी हा किल्ला अत्यंत योग्य आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/ आदित्य चव्हाण)

5 / 5
बामणोली गावातून वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी शिवसागर तलाव बोटीने पार करावा लागतो. तिथून वनखात्याच्या चेकपोस्टपासून चढाई करत दोन तासांत तुम्ही वासोट्याच्या माथ्यावर पोहोचता. हा संपूर्ण प्रवास घनदाट जंगलाने वेढलेला आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/ आदित्य चव्हाण)