
हिंदू धर्मात केळीच्या झाडाला एक विशेष स्थान आहे. कोणत्याही शुभ कार्यामध्ये मंडप किंवा प्रवेशद्वार सजवण्यासाठी केळीच्या पानांचा वापर केला जातो. या झाडात साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी निवास करतात, अशी लोकांची श्रद्धा आहे.

घरात केळीचे झाड लावल्यास केवळ धार्मिकच नाही, तर अनेक वास्तुशास्त्रीय फायदेही मिळतात. तुमच्या घरात केळीचे झाड असेल तर ते लावल्याने काय होते, ते जाणून घेऊया.

हिंदू धर्मात केळीच्या झाडाला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. तुळशीच्या झाडानंतर, या झाडाला विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक कार्यांमध्ये आणि शुभ प्रसंगी केळीच्या पानांचा वापर केला जातो, ज्यामुळे घरात सकारात्मकता येते.

घरात केळीचे झाड लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांतीचा संचार होतो. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि आनंद टिकून राहतो. वास्तूशास्त्रानुसार केळीचे झाड आर्थिक समस्या दूर करण्यास मदत करते.

घरात आर्थिक स्थिरता आणण्यासाठी केळीच्या झाडाचा मोठा उपयोग होतो. केळीचे झाड गुरु ग्रहाशी संबंधित आहे. हे झाड घरात लावल्याने गुरु ग्रह मजबूत होतो. यामुळे वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात. ज्यामुळे नात्यात गोडवा आणि आनंद वाढतो.

जर नियमितपणे केळीच्या झाडाची पूजा केली तर विष्णू देवाचे आशीर्वाद मिळतात. ज्यामुळे जीवनातील अडचणी दूर होतात. अनेक ठिकाणी गुरुवारी या झाडाची पूजा केली जाते. कारण गुरुवार हा विष्णू देवाला समर्पित केला जातो.

वास्तूशास्त्रानुसार, केळीचे झाड उत्तर दिशेला लावणे सर्वात शुभ मानले जाते. ही दिशा देवतांची मानली जाते, ज्यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते. या झाडाजवळ नेहमी स्वच्छता ठेवा. त्याच्या जवळ घाण किंवा कचरा साचू देऊ नका.

या झाडाला नियमित पाणी द्या. जेणेकरुन ते सुकणार नाही. केळीचे झाड घराच्या समोरच्या दरवाजाजवळ किंवा मुख्य मार्गावर लावू नये. तसेच या झाडाच्या जवळ तुळशीचे रोप लावू नये.