
वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात आणि विशेषतः झोपण्याच्या ठिकाणी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

झोपताना आपल्या पलंगाखाली किंवा उशीखाली काही विशिष्ट वस्तू ठेवल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो, असे वास्तुतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जर तुम्हालाही पलंगाखाली काही ना काही ठेवायची सवय असेल तर ही सवय नक्कीच बदला. कारण या सवयींमुळे घरात पैशाची आवक थांबते. तसेच अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

वास्तु तज्ज्ञांच्या मते, झोपताना पैसे आणि पर्स कधीही उशीखाली किंवा पलंगाखाली ठेवू नयेत. असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे घरात पैशाचा ओघ कमी होतो.

झोपताना उशीखाली पैसे ठेवून झोपणाची सवय असणाऱ्याला नेहमीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

याचप्रमाणे, सोन्या-चांदीचे दागिने किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू डोक्याजवळ ठेवून झोपणे अशुभ मानले जाते. यामुळे जीवनात नकारात्मकता आणि अडथळे वाढतात.

सोन्या-चांदीचे दागिने नेहमी तिजोरीत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. जेणेकरून देवी लक्ष्मी आणि धन कुबेर यांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील.

त्यासोबतच घराच्या, वाहनाच्या किंवा तिजोरीच्या चाव्या उशीखाली किंवा पलंगाखाली ठेवून झोपणे टाळावे. वास्तुशास्त्रानुसार, पलंगाखाली चावी ठेवून झोपल्याने कुटुंबात आर्थिक संकट येऊ शकते, असे मानले जाते.