तुमच्या घरात पूर्वजांचे फोटो कोणत्या दिशेला? लगेच बदला, नाहीतर येईल दुर्दैव!

वास्तुशास्त्रानुसार, घरात पूर्वजांचे फोटो ठेवणे शुभ मानले जाते, पण त्यांची योग्य जागा निवडणे महत्त्वाचे आहे. देवघर, ब्रह्मस्थान, बेडरूम किंवा स्वयंपाकघरात ते ठेवू नयेत.

| Updated on: Sep 17, 2025 | 11:26 PM
1 / 10
अनेक घरांमध्ये आपल्या दिवंगत पूर्वजांचे फोटो आदराने लावले जातात. आपल्या पूर्वजांच्या आठवणी जपण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घरात राहावा, यासाठी आपण त्यांचे फोटो लावत असतो. वास्तुशास्त्रानुसार, हे एक अत्यंत शुभ कार्य मानले जाते.

2 / 10
पण अनेकदा आपल्या पूर्वजांचे फोटो लावताना आपण काही चुका करतो. हे फोटो नेमके कुठे आणि कसे लावावे याबद्दल काही खास नियम आहेत. मात्र कळत-नकळत आपल्याकडून काही चुका होतात. ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते.

3 / 10
वास्तुशास्त्रानुसार, देवघरात देवांच्या मूर्ती किंवा फोटोंसोबत मृत व्यक्तीचे फोटो ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. देव आणि पितर यांना एकाच ठिकाणी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते. तसेच यामुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे देवाची पूजा करताना मन विचलित होण्याची शक्यता असते.

4 / 10
घराच्या मध्यभागी असलेल्या जागेला ब्रह्मस्थान असे म्हणतात. हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. या ठिकाणी मृत व्यक्तीचा फोटो ठेवल्यास कुटुंबातील सदस्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास होण्याची शक्यता असते.

5 / 10
बेडरूममध्ये मृत व्यक्तींचे फोटो लावणे अशुभ मानले जाते. कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे शांत झोपेला अडथळा येऊ शकतो. त्याचप्रमाणे, स्वयंपाकघर आणि बाथरूमच्या जवळच्या भिंतींवरही फोटो लावू नयेत.

6 / 10
त्यासोबतच जिन्याखाली किंवा स्टोअररुममध्ये पूर्वजांचे फोटो ठेवू नये. ही ठिकाणे नकारात्मक ऊर्जा आणि दुर्लक्ष दर्शवतात, ज्यामुळे पूर्वजांचा अनादर होतो असे मानले जाते.

7 / 10
वास्तुशास्त्रानुसार, पूर्वजांचे फोटो नेहमी दक्षिण दिशेला लावावेत. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. यामुळे घरात शांतता आणि स्थिरता येते. हे फोटो लावताना त्यांचे तोंड उत्तर दिशेला येईल असे लावावे.

8 / 10
मृत व्यक्तीचा फोटो थेट भिंतीवर खिळ्याने लावण्याऐवजी, तो लाकडी स्टँड किंवा टेबलावर ठेवावा. यामुळे फोटोला योग्य आदर मिळतो. तो वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार योग्य मानला जातो.

9 / 10
जर शक्य असेल तर पूर्वजांचे फोटो नेहमी हसऱ्या चेहऱ्याचे आणि आनंदी क्षणांचे असावेत. यामुळे घरात सकारात्मक आणि आनंदी वातावरण टिकून राहते. या नियमांचे पालन केल्यास घरात पूर्वजांचा आशीर्वाद सदैव राहतो. कुटुंबाला सुख-समृद्धी लाभते, असे वास्तुशास्त्रात मानले जाते.

10 / 10
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)