
घराचे स्वयंपाकघर हे केवळ अन्न शिजवण्याचे ठिकाण नसून ते सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असते. आपण ज्या पद्धतीने अन्न बनवतो आणि वाढतो, त्याचा थेट परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर आणि मानसिक शांततेवर होत असतो.

अनेक घरांमध्ये पोळ्या किंवा चपत्या मोजून करण्याची सवय असते, मात्र वास्तु तज्ज्ञांच्या मते ही सवय घरासाठी घातक ठरू शकते. वास्तुशास्त्रानुसार, अन्न मोजणे हे अभावाचे लक्षण मानले जाते.

जेव्हा आपण पोळ्या मोजतो, तेव्हा आपण नकळतपणे अन्नाची कमतरता दर्शवत असतो. यामुळे अन्नाची देवता माता अन्नपूर्णा आणि धनलक्ष्मीचा अपमान होतो.

मोजून पोळ्या केल्याने घरात बरकत राहत नाही. तसेच अन्नाचा मान कमी होतो. वास्तुशास्त्रानुसार, पोळ्या मोजून केल्याने उत्पन्नाचे स्त्रोत कमी होतात आणि अनावश्यक खर्च वाढू लागतात.

स्वयंपाकघरातील चपात्या मोजण्याच्या पद्धतीमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम घरातील सदस्यांच्या स्वभावावर होतो. यामुळे विनाकारण वाद आणि तणाव वाढू शकतो.

अन्नाचा आदर न केल्याने घरातील सुख-समृद्धीवर विपरित परिणाम होतो. नेहमी पहिली पोळी गाईसाठी काढावी, यामुळे वास्तुदोष दूर होतात. कुटुंबाच्या गरजेपेक्षा नेहमी दोन-तीन पोळ्या जास्तच कराव्यात.

अन्न बनवताना मनात राग, द्वेष किंवा ताण असू नये. आनंदी मनाने बनवलेले अन्न सात्विक आणि आरोग्यदायी असते. जर पोळ्या उरल्या तर त्या टाकून न देता गरजू व्यक्तीला किंवा प्राण्यांना द्याव्यात. जर तुम्ही या नियमांचे पालन केलात तर घरात लक्ष्मीचा वास राहतो. तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण टिकून राहते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)