पैसा येतो पण टिकत नाही? तुमच्या घरातील एक चूक ठरतेय अडचण

तुमच्या घरात पैसा का टिकत नाही, घरात पैशाची तंगी नेमकी कशामुळे होते, घरातील सकारात्मक ऊर्जा कशी कमी होते आणि त्याचा तुमच्या आर्थिक व शारीरिक स्थितीवर काय परिणाम होतो, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

| Updated on: Feb 19, 2026 | 1:53 PM
1 / 6
कपाट ही आपल्या घरातील एक अशी वस्तू आहे, ज्याचा वापर आपण कपडे, पैसे आणि मौल्यवान वस्तू साठवण्यासाठी करतो. त्यामुळे कपाट हे घरात आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

कपाट ही आपल्या घरातील एक अशी वस्तू आहे, ज्याचा वापर आपण कपडे, पैसे आणि मौल्यवान वस्तू साठवण्यासाठी करतो. त्यामुळे कपाट हे घरात आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

2 / 6

अनेकदा घरातील अपुऱ्या जागेमुळे किंवा सोय म्हणून आपण कपाटावर पुस्तके, जुने कपडे, बॅगा आणि अनावश्यक गोष्टी साठवून ठेवतो. वास्तुशास्त्रानुसार या सवयीमुळे घरातील सकारात्मक उर्जेवर परिणाम होतो. तसेच यामुळे हळूहळू विविध समस्या निर्माण होतात.

3 / 6

जेव्हा कपाटावर आपण भारदस्त वस्तू ठेवतो, त्यामुळे घरात राहणाऱ्या सदस्यांमध्ये अनेकदा अस्वस्थता, ताणतणाव निर्माण होतो. तसेच कोणताही निर्णय घेण्यास त्यांना विलंब होतो. याचा परिणाम केवळ मानसिक स्थितीवरच नाही तर आरोग्यावरही होतो.

4 / 6

घरातील कपाटावर विविध सामान ठेवल्याने घरांमधील व्यक्तींना किरकोळ आणि मोठे आजार वारंवार होतात. तसेच घरातील कुटुंबप्रमुखाच्या दैनंदिन आयुष्यावरही याचा परिणाम होतो.

5 / 6

घरातील कपाटावर जर सामान असेल तर त्यामुळे पैशाच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्या व्यक्तींच्या घरात पैसा येतो, पण तो टिकत नाही. ज्यामुळे अनावश्यक खर्च वाढतो. वास्तुशास्त्रानुसार या गोष्टीमुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. ज्यामुळे घराची समृद्धी मंदावते.

6 / 6

यावर उपाय म्हणून तुम्ही प्रथम कपाटातून सर्व अनावश्यक आणि जुन्या वस्तू काढून टाका. तसेच घरातून वापरात नसलेल्या वस्तूही काढून टाका. त्या नीटनेटक्या जागी ठेवा. तसेच एखादे लहान रोपे किंवा मंद सुंगध असणारी अगरबत्ती याचाही तुम्ही वापर करु शकता. यामुळे कपाट स्वच्छ, हलके आणि सकारात्मक उर्जेने भरलेले राहील. तसेच तुम्ही तुमचे कपाट नियमितपणे स्वच्छ, व्यवस्थित आणि नीटनेटके ठेवा. यामुळे सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us