Vastu Tips | घरात सकारात्मक ऊर्जा, सुख-समृद्धी वाढवण्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा, भरभराट नक्की होईल

| Updated on: Nov 23, 2021 | 2:12 PM

घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. असे केल्याने नकारात्मकता दूर होते आणि घरात सकारात्मक वाढून घरातील सदस्यांच्या आयुष्यात चांगले बदल होतात.

1 / 5
घराच्या प्रवेशद्वारावर तुळशीचे रोप लावा. तुळशीच्या रोपाची पूजा भगवान विष्णूशी संबंधीत असल्यामुळे आणि औषधी गुणधर्मांमुळेही तीचे अनेक फायदे आहेत. तुळस वातावरणातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सभोवतालची सकारात्मक ऊर्जा वाढवते. ते पूर्व दिशेला ठेवावे. याशिवाय उत्तरेकडे किंवा उत्तर-पूर्वेला खिडकीजवळही ठेवता येते.

2 / 5
घराच्या प्रवेशद्वाराजवळ शू स्टँड उघडे ठेवू नका. हे फक्त घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. शू रॅक ठेवण्याची उत्तम दिशा म्हणजे पश्चिम किंवा नैऋत्य कोपरा. तुम्ही ते उत्तर, दक्षिण-पूर्व आणि पूर्व दिशांना ठेवू नये.

3 / 5
भिंत घड्याळे नेहमी कार्यरत स्थितीत असावी. घड्याळ नेहमी घराच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर भिंतीवर लावावेत. भिंतीचे घड्याळ या दिशेला ठेवल्यास नवीन संधी मिळण्यास मदत होते आणि कोणत्याही अडचणीशिवाय काम करण्यास मदत होते. हिरव्या रंगाची घड्याळे टाळा.

4 / 5
घराची नेमप्लेट स्वच्छ असावी. चमकदार नेमप्लेट संधींना आकर्षित करते. घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या जीवनशैलीचीही व्याख्या सांगत असते.

5 / 5
जड फर्निचर दक्षिण आणि पश्चिम भिंतींजवळ ठेवावे, तर हलके फर्निचर उत्तर आणि पूर्व भिंतीला लागून ठेवावे. अधिक लाकडी फर्निचर वापरण्याचा प्रयत्न करा कारण ते प्लास्टिकच्या फर्निचरसारखे हानिकारक वायू उत्सर्जित करत नाहीत. धातूचे फर्निचर देखील टाळले पाहिजे कारण ते आपल्या आजूबाजूला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार करतात, ज्यामुळे नकारात्मकता वाढते.