
जगात इस्लाम धर्म मानणाऱ्यांची संख्या २०० कोटीहून अधिक आहे. तुम्हाला युरोपपासून आशियात सर्व जागी इस्लाम धर्माचे लोक सापडतील. काही दुर्गम बेटे सोडले तर जगभरात सर्वत्र विविध धर्माचे लोक सापडतील. परंतू एक असाही देश आहे जो संपूर्णपणे स्वतंत्र आहे. ज्याच्या सरकारी दफ्तरात एका मुस्लीम नागरिकांची नोंद झालेली नाही.

'व्हेटिकन सिटी' हा तो देश आहे,जेथे एकही मुस्लीम नागरिक तुम्हाला सापडणार नाही. हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. परंतू या मागचे कारण समजले तर तुम्हाला खरी गोम कळेल. हा जगातील एकमेव देश आहे जेथे एक देखील मुस्लीम नागरिक नाही. इटलीमध्ये स्थित हा छोटासा देश आपली अनोखी लोकसंख्या आणि कायद्यामुळे नेहमी चर्चेत असतो.

व्हेटिकन सिटी जगातील सर्वात छोटा स्वतंत्र देश आहे, जो इटलीची राजधानी रोमच्या मधोमध स्थित आहे. याचे क्षेत्रफळ केवळ ४९ हेक्टर आहे. हा रोमन कॅथलिक चर्चचे मुख्यालय आहे. आणि येथे पोपचे निवासस्थान आहे. येथे सुमारे ८०० लोक रहातात. ज्यात फादर, कार्डिनल, चर्च अधिकारी आणि सुरक्षेसाठी प्रसिद्ध स्विस गार्ड सामील आहे. सर्व सामान्य नागरिकांनासाठी हा कोणता सामान्य रहाण्यायोग्य देश नाही, हे एक धार्मिक प्रशासकीय केंद्र आहे.

व्हेटिकन सिटीची अनोखे नागरिकत्व सिस्टीम यास जबाबदार आहे. व्हेटिकन सिटीत नागरिकत्व जन्मामुळे मिळत नाही. येथे नागरिकत्व केवळ त्याच लोकांना मिळते जे चर्च वा व्हेटीकन प्रशासनासाठी काम करतात.जशी या नागरिकांची सेवा समाप्त होते तसेच त्यांचे नागरिकत्व संपते.त्यामुळे येथे स्थायी नागरी लोकसंख्या निर्माण होत नाही.स्वाभाविक रुपाने बहुतांश नागरिक कॅथलिक चर्चशी संबंधित आहेत. हेच कारण आहे की सरकारी रेकॉर्डनुसार येथे मुस्लीम नागरिक जवळपास नाहीतच..

हा केवळ भ्रम आहे की व्हेटीकन सिटी पर्यटकांसाठी संपूर्ण खुली आहे. येथे दरवर्षी लाखो लोक येत असतात. ज्यात मुस्लीम पर्यटक, राजकीय अधिकारी आणि विद्वानांचा समावेश असतो. मुस्लीम देशांचे राजदूत पोपना भेटतात. आणि आंतरधार्मिक संवाद देखील होतो. येथे मस्जिद नसणे हे नागरिकत्व नियम आणि धार्मिक प्रशासकीय कारणांचा परिणाम आहे.

व्हेटीकन सिटी क्षेत्रफळात भलेही छोटासा देश असला तरी त्याचा प्रभाव मोठा आहे. हा सुमारे १.३ अब्ज कॅथलिकांचे आध्यात्मिक केंद्र आहे. येथून जागतिक धर्म, राजकारण आणि सामाजिक मुद्यांवर वक्तव्य जारी होतात. संपूर्ण व्हेटीकन युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे.येथील कला, संग्रहालय आणि चर्च जगातील सर्वात मुल्यवान वारशात गणली जातात.

व्हेटीकन सिटीत कोणतीही सरकारी शाळा नाही. चर्च अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मुले शेजारील रोम शहरात शिकतात. यावरुन स्पष्ट होते की व्हेटीकन हे काही सामान्य राष्ट्र नाही, एक धार्मिक आणि प्रशासकीय मायक्रो स्टेट आहे.

भविष्यात व्हेटिकन सिटीत त्याच्या प्रशासकीय मॉडेलला अधिक आधुनिक बनवू शकतो. डिजिटल नागरिकता, स्थायी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे आणि आंतरधार्मिक संवादची वाढती भूमिका याचे स्वरुप बदलू शकते. परंतू याचे धार्मिक स्वरुप आणि विशिष्ट नागरिकत्व नियम कदाचित कायम स्वतंत्र राहतील.