मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच होणार ‘बीच वेडिंग’; गोव्याच्या 5 स्टार हॉटेलमध्ये शूटिंग

सर्वजण हसत-खेळत आणि गोड गप्पा मारत हे क्षण साजरे करत होते. सोहळ्यातील उत्साह आणि आनंदाची ऊर्जा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7.30 वाजता ‘वीण दोघातली ही तुटेना’चा लग्नसोहळा विशेष भाग पहायला मिळेल.

| Updated on: Oct 27, 2025 | 4:22 PM
1 / 5
मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच एका भव्य ‘बीच वेडिंग’चा सोहळा पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांच्या मनात घर करणारी झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचली आहे. समर आणि स्वानंदी यांच्या प्रवासात आता नवीन वळण येणार आहे, ज्याची सर्व चाहत्यांना आतुरता आहे.

2 / 5
आधिरा आणि रोहन यांच्या लग्नासाठी समर आणि स्वानंदी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसणार आहेत. अनेक अडथळ्यांवर मात करत अखेर दोघांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. या लग्न मांडवात एक नाही तर दोन लग्न होणार आहेत. आधिरा-रोहन आणि समर-स्वानंदी यांचं.

3 / 5
या खास लग्नसोहळ्याचं चित्रीकरण करण्यासाठी मालिकेची संपूर्ण टीम गोव्यात दाखल झाली आहे, ज्यामुळे मालिकेच्या कथानकाला एक नवा रंग मिळाला आहे. दक्षिण गोव्याच्या आलिशान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार असून समुद्रकिनाऱ्याच्या मनोहारी वातावरणात ‘बीच वेडिंग’चा थाटमाट पाहायला मिळणार आहे.

4 / 5
सजवलेला समुद्रकिनारा, सुंदर फुलांनी नटलेला मंडप आणि कलाकारांचे आकर्षक पोशाख हे या विशेष भागाचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे. आधिरा आणि रोहन यांच्या प्रेमकहाणीला झालेली सुरुवात जितकी हृदयस्पर्शी आहे, तितकाच समर आणि स्वानंदी यांच्या निर्णयाने मालिकेला एक भावनिक वळण मिळणार आहे.

5 / 5
भावंडांच्या प्रेमासाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय पुढे त्यांच्या आयुष्यात काय बदल घडवतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. गोव्याला निघण्याआधी मुंबईत मुहूर्तमेढ आणि स्वानंदीचा खास मेहंदी सोहळा पार पडला. या आनंदात रोहन आणि संपूर्ण कुटुंब उत्साहाने सहभागी झाले.