व्हेनेझुएलाचे लोक खातात विचित्र प्राण्याचे मांस, नाव समजताच बसेल आश्चर्याचा धक्का!

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहेत. त्यांच्याविरोधात आता खटला उभारण्यात आला आहे. याच कारणामुळे व्हेनेझुएला या देशाची जगभरात चर्चा होत आहे.

| Updated on: Jan 05, 2026 | 5:45 PM
1 / 5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन सैनिकांनी व्हेनेझुएला या देशाच्या अध्यक्षांना थेट अटक केली आहे. सध्या या देशाचे अध्यक्ष निकोलस मादुरो हे न्यूयॉर्कच्या तुरुंगात आहेत. दरम्यान, अमेरिकेच्या या कारवाईनंतर आता व्हेनेझुएला हा देश जगभरात चर्चेत आला आहे. आता या देशात खाल्ल्या जाणाऱ्या एका खाद्यपदार्थाची जगभरात चर्च होत आहे.

2 / 5
बहुसंख्य देशात लोक चिकन, मटन आणि बिफ खातात. भारतातही मासं म्हणून कोंबडी, बकरी खाल्लाली जाते. परंतु व्हेनेझुएला या देशात मात्र एका अजब प्राण्याचे मांस खाल्ले जाते. व्हेनेझुएलामध्ये मोठ्या चवीने ज्या प्राण्याचे मांस खाल्ले जाते, त्याला बहुसंख्य देशातील लोक ओळखतही नाहीत.

3 / 5
व्हेनेझुएला हा देश विविधतेने नटलेला आहे. या देशात काही ठिकाणी नद्या आहेत. तर काही ठिकाणी डोंगर, दऱ्या पाहायला मिळतात. म्हणूनच तेथील लोकांचे खाद्यपदार्थ हे नैसर्गिक साधनसंपत्तीशी जोडलेले आहेत. लॅटीन अमेरिकेतील बहुसंख्य लोक हे बिफ आणि चिकन खातात. परंतु व्हेनेझुएला लोक वेगळ्याच प्राण्याचे मांस खातात.

4 / 5
या प्राण्याचे नाव कॅपीबारा असे आहे. हा प्राणी दिसायला फारच विचित्र असतो. व्हेनेझुएलामध्ये या प्राण्याचे मांस मोठ्या चवीने खाल्ले जाते. उंदराच्या प्रजातीमधील कुरतडून अन्न खाणारा हा सर्वात मोठा प्राणी आहे. हा प्राणी व्हेनेझुएलामध्ये नदी, सरोवर, दलदलीच्या ठिकाणी आढळतो. दक्षिण अमेरिकतील अनेक देशांत हा प्राणी पाहायला मिळतो.

5 / 5
विशेष म्हणजे व्हेनेझुएलामध्ये या प्राण्याचे मांस अगदी सहज उपलब्ध होते. हे मांस प्रोटीनचा मोठा स्त्रोत असल्याचे सांगितले जाते. तेथील सैनिकांना आहारात बिफ, चिकन यासोबतच कॅपीबारा या प्राण्याचेही मांस खायला दिले जाते.