
श्रीदेवी यांनी धर्मेंद्र आणि सनी देओल दोघांसोबत वेगवेगळ्या चित्रपटात काम केलं.चालबाज, राम अवतार आणि निगाहे या चित्रपटात श्रीदेवीसोबत सनी देओलने रोमान्स केला, तर नाकाबंदी आणि जानी दोस्त या चित्रपटात धर्मेंद्र-श्रीदेवी नायक-नायिका होत्या.

अमृता सिंहने 1983 साली बेताबी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यावेळी सनी देओल हिरो आणि अमृता हिरॉईन होती. त्यानंतर सहावर्षांनी 'सच्चाई की ताकत'चित्रपटात अमृता धर्मेंद्र यांची नायिका होती. तिने पत्नीचा रोल साकारलेला.

जयाप्रदा सुद्धा अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे. वीरता चित्रपटात जयाप्रदा यांनी सनी देओलसोबत पडद्यावर रोमान्स केला. त्यानंतर 'मैदान-ए-जंग', 'कुंदन', 'गंगा तेरे देश में' आणि 'एलान-ए-जंग' या चित्रपटात जयाप्रदा धर्मेंद्र यांची नायिका होती.

डिंपल कपाडिया यांनी धर्मेंद्र आणि सनी देओल सोबत अनेक चित्रपट केले. 'इंसानियत के दुश्मन' आणि 'बटवारा'मध्ये धर्मेंद्र सोबत काम केलं. तेच सनी देओल सोबत डिंपलने 'अर्जुन', 'मंजिल-मंजिल', 'नरसिम्हा, 'आग का गोला' आणि 'गुनाह' सारखे हिट चित्रपट दिले.

पूनम ढिल्लों यांना सनी देओल आणि धर्मेंद्र या दोघांसोबत काम करण्याची संधी मिळाली. सनी देओलसोबत पूनम यांनी 'सोहनी महिवाल', 'सवेरे वाली गाड़ी' आणि 'समुंदर' चित्रपट केले. दोघांची केमिस्ट्री लोकांना आवडली. धर्मेंद्र सोबत 'सोने पे सुहागा'मध्ये काम केलं.